पंजाबच्या विद्यापीठांचे वर्चस्व








शिवाजी विद्यापीठाच्या महिलांची लक्षवेधक कामगिरी; 

अखिल भारतीय आंतरविद्यापीठ कयाकिंग व कॅनॉईंग स्पर्धा

सांगली : भारतीय विद्यापीठे महासंघ (ए.आय.यू.) आणि  शिवाजी विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित अखिल भारतीय आंतरविद्यापीठ कयाकिंग व कॅनॉईंग (पुरुष व महिला) स्पर्धेत दुसऱ्या दिवसअखेर पंजाबमधील विद्यापीठांनी आपले वर्चस्व सिद्ध केले. अमृतसरच्या गुरू नानक देव विद्यापीठाने आघाडी घेतली असून, मोहालीच्या चंदीगड विद्यापीठ आणि चंदीगडच्या पंजाब विद्यापीठ  यांनीही प्रभावी कामगिरी नोंदवली.


यजमान शिवाजी विद्यापीठाच्या महिला खेळाडूंनी के-१ (१००० मी.), सी-१ (१००० मी.) आणि के-४ (१००० मी.) प्रकारांत चौथा क्रमांक पटकावत उल्लेखनीय कामगिरी केली. कृष्णा बोट क्लब येथे पार पडलेल्या स्पर्धांमध्ये गुरू नानक देव विद्यापीठाने पुरुष गटातील के-२, सी-२, के-४ तसेच महिला गटातील के-१ व के-२ प्रकारांत अव्वल स्थान मिळवले. चंदीगड विद्यापीठाने पुरुष व महिला गटातील के-२ व के-४ प्रकारात चमकदार कामगिरी केली. महिला गटातील सी-१ आणि सी-२ प्रकारात पंजाब विद्यापीठाने प्रथम क्रमांक मिळवला. तर लव्हली प्रोफेशनल विद्यापीठाने पुरुष गटातील सी-१ स्पर्धेत अव्वल येत उपस्थितांची दाद मिळवली.

स्पर्धेतील १००० मीटर अंतराच्या विविध गटांतील निकाल पुढीलप्रमाणे :

पुरुष गट : K1 – वंश शर्मा (मोहनलाल सुखाडिया विद्यापीठ) – ०३:४१.३५

C1 – हर्ष पाल (लव्हली प्रोफेशनल विद्यापीठ) – ०४:०२.५४

K2 – आदित्य सिंह, सचिन (गुरू नानक देव विद्यापीठ) – ०३:१८.४४

C2 – प्रिन्स गोस्वामी, हर्ष वर्मा (गुरू नानक देव विद्यापीठ) – ०३:४२.१३

K4 – मयंक शर्मा व सहकारी (गुरू नानक देव विद्यापीठ) – ०३:०२.४४



महिला गट :

K1 – चंद्रकला कुशवाहा (गुरू नानक देव विद्यापीठ) – ०४:१५.४०

C1 – निक्की (पंजाब विद्यापीठ) – ०४:४५.८३

K2 – कुसुम, अचल काचरू साहरे (चंदीगड विद्यापीठ) – ०४:०४.०४

C2 – प्रिया चौरसिया, रिशिका कुमारी एक्का (पंजाब विद्यापीठ) – ०४:२९.८३

K4 – रिशिता व सहकारी (चंदीगड विद्यापीठ) – ०३:४२.७६


या स्पर्धेत पंजाबमधील विद्यापीठांनी सर्व गटांत सातत्यपूर्ण आणि दमदार कामगिरी करत आघाडी कायम राखली, तर शिवाजी विद्यापीठाच्या महिला खेळाडूंनी दिलेली झुंजही विशेष उल्लेखनीय ठरली.



Post a Comment

Previous Post Next Post