अंतिम फेरीआधी विराटचा ‘मस्ती मूड वायरल

नवी दिल्ली :आयपीएल २०२६ स्पर्धेच्या पहिल्या पात्रता सामन्यात बंगळुरुने गुजरातवर ९२ धावांनी दणदणीत विजय मिळवत सलग दुसऱ्यांदा अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. गतविजेत्या बंगळुरुने या विजयासह जेतेपदावर आपला मजबूत दावा ठोकला आहे. आता अंतिम फेरीत त्यांचा सामना कोणाशी होणार याकडे क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, या सामन्यापूर्वीचा विराट कोहलीचा एक मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये विराट गुजरातच्या खेळाडूंना चिडवत आणि मस्करी करताना दिसत आहे.

धर्मशाळा येथील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर हा सामना खेळवण्यात आला. नाणेफेकीत गुजरातच्या बाजूने कौल लागल्यानंतर बंगळुरुला प्रथम फलंदाजी करावी लागली. सामना सुरू होण्यापूर्वी गुजरात संघाचे छायाचित्रण सुरू होते. त्यावेळी विराट कोहली फलंदाजीसाठी सज्ज होऊन सीमारेषेजवळ उभा होता.

याचवेळी विराटने गुजरातच्या खेळाडूंना पाहताच काही मजेशीर हावभाव केले आणि हसत त्यांना डिवचल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. विराट नेमकं कोणाला चिडवत होता हे स्पष्ट झालेलं नसले तरी गुजरात संघात त्याचे काही जवळचे मित्र आहेत.

गुजरातकडून खेळणारा वेगवान गोलंदाज इशांत शर्मा, संघाचे प्रशिक्षक आशिष नेहरा तसेच कर्णधार शुभमन गिल यांच्यासोबत विराटची चांगली मैत्री आहे. त्यामुळे तो अनेकदा मैदानावर त्यांच्यासोबत मस्करी करताना दिसतो.

विशेष म्हणजे हा व्हिडीओ विराटचा अंडर-१९ काळातील सहकारी तरूवर कोहली याने शूट केला आहे. सामना पाहण्यासाठी मैदानात आलेल्या तरूवरने हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आणि काही वेळातच तो तुफान व्हायरल झाला.



#विराटकोहली #आरसीबी #आयपीएल२०२६ #गुजरातटायटन्स #क्रिकेट #व्हायरलव्हिडीओ #शुभमनगिल #आशिषनेहरा #इशांतशर्मा #मराठीबातम्या #ViratKohli #RCB #IPL2026 #RoyalChallengersBengaluru #GujaratTitans #CricketNews #ViralVideo #ShubmanGill #IshantSharma #AshishNehra #IPLPlayoffs #Finals #CricketFans #TrendingNow #SportsNews #KingKohli #ViratFans #RCBFans #IndianCricket #TrendingVideo


Post a Comment

Previous Post Next Post