कागल \ शेखर धोंगडे : राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांना बकरी ईदनिमित्त विविध क्षेत्रातील मान्यवरांसह नागरिकांनी मोठ्या संख्येने भेट देत शुभेच्छा दिल्या.
शुभेच्छा देण्यासाठी आलेल्यांमध्ये माजी आमदार के. पी. पाटील, माजी आमदार राजेश पाटील, माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर, ए. वाय. पाटील, प्रताप उर्फ भैया माने, प्रकाशराव गाडेकर, गोकुळ दूध संघाचे माजी अध्यक्ष विश्वासराव पाटील, अरुणराव डोंगळे, युवराज पाटील, बाळासाहेब खाडे, अजित नरके, करणसिंह गायकवाड, अमरीशसिंह घाटगे, एस. आर. पाटील, किसन चौगुले, रणजीतसिंह पाटील, अमर पाटील यांचा समावेश होता.
तसेच, (Kolhapur Agricultural Produce Market Committee ) कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष नानासाहेब कांबळे, (Raje Vikramsinh Kagal Co-operative Bank) राजे विक्रमसिंह कागल को-ऑपरेटिव्ह बँकचे माजी अध्यक्ष एम. पी. पाटील-बामणीकर, (Chhatrapati Shahu Sugar Factory ) छत्रपती शाहू साखर कारखानाचे संचालक युवराज पाटील, बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर, भूषण पाटील, जयंत पाटील-कासारीकर, शिरोळचे माजी नगराध्यक्ष अमरसिंह माने-पाटील, शिरीष देसाई, पंचायत समितीचे उपसभापती डॉ. इंद्रजीत पाटील, प्रवीणसिंह भोसले, ए. वाय. पाटील-म्हाकवेकर, के. के. पाटील आदींनीही मंत्री मुश्रीफ यांची भेट घेऊन ईदच्या शुभेच्छा दिल्या.
दरम्यान, राज्याच्या उपमुख्यमंत्री (Sunetra Pawar) सुनेत्राताई पवार, (Praful Patel) प्रफुल पटेल, (Sunil Tatkare) सुनील तटकरे तसेच शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजीतसिंह घाटगे यांनी दूरध्वनीद्वारे मंत्री मुश्रीफ यांना बकरी ईदच्या शुभेच्छा दिल्या.
