सूर्यकुमार यादवला टी-20 कर्णधारपदावरून हटवणार?


नवी दिल्ली 

 टीम इंडियाला टी20 वर्ल्ड कप जिंकून देणाऱ्या सुर्यकुमार यादवला मोठा धक्का बसला आहे. कारण सूर्यकुमार यादवला कर्णधारपदावरून हटवण्यात आले आहे. मिडिया रिपोर्टनुसार, सूर्याकडून टी20 आंतरराष्ट्रीय कर्णधारपद काढून घेण्यात आले आहे. हे प्रकरण केवळ कर्णधारपद गमावण्यापुरते मर्यादित नाही; वृत्तांनुसार सूर्याचे संघात टिकून राहणेही कठीण होईल. टीम इंडियाची पुढील टी20 आंतरराष्ट्रीय मालिका आयर्लंड आणि इंग्लंडविरुद्ध होणार आहे. या मालिकेपूर्वीच सूर्याला कर्णधारपदावरून हटवल्याची बातमी समोर आली आहे.
एका वृत्तानुसार, सूर्यकुमार यादवला भारताच्या टी20 आंतरराष्ट्रीय कर्णधारपदावरून हटवण्यात आले आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI), संघ व्यवस्थापन आणि निवड समिती यांच्याशी सल्लामसलत करून, नवीन हंगामासाठी नवीन कर्णधाराची नियुक्ती करेल. यावरून हे स्पष्ट होते की, 'मेन इन ब्लू' संघाला आता एक नवीन टी20आंतरराष्ट्रीय कर्णधार मिळेल.
अहवालात बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याच्या हवाल्याने म्हटले आहे की, "निवड समिती, बीसीसीआय आणि संघ व्यवस्थापनाने प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्याशी सल्लामसलत करून भारताने आता नवीन कर्णधार निवडावा असा निर्णय घेतला आहे. सूर्याच्या नेतृत्वाखाली संघाने टी20 विश्वचषक जिंकला होता, परंतु त्याचा फॉर्म आणि भविष्य पाहता, संघाला वाटले की आता पुढे जाण्याची वेळ आली आहे."


Post a Comment

Previous Post Next Post