श्री पिंपळेश्वर महादेव मंदिरात खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची शिवपूजा



पक्षप्रवेश सोहळ्यात विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा सहभाग

डोंबिवली \ शंकर जाधव : सागाव येथील श्री पिंपळेश्वर महादेव मंदिरात शिवसेना खासदार तथा संसदरत्न डॉ. श्रीकांत शिंदे यांनी भगवान शिवशंकराची अभिषेक व विधिवत पूजा केली. यावेळी मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.

यानंतर श्री पिंपळेश्वर महादेव मंदिर संस्थानच्या मैदानात विविध पक्षांतील माजी लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, प्रशासनातील निवृत्त अधिकारी, उच्च विभूषित नागरिक, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी तसेच विविध जाती-ज्ञाती समाजातील प्रतिष्ठित नागरिकांचा शिवसेनेत पक्षप्रवेश सोहळा उत्साहात पार पडला.

या कार्यक्रमास शिवसेनेचे कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, उपजिल्हाप्रमुख राजेश कदम, आमदार राजेश मोरे, खासदार बाळ्यामामा, युवासेना पदाधिकारी जितेन पाटील, महिला पदाधिकारी लता पाटील, कविता गावंड, रश्मी गव्हाणे यांच्यासह शिवसेनेचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी डॉ. श्रीकांत शिंदे यांनी उपस्थितांशी संवाद साधत शिवसेनेच्या विचारांवर विश्वास ठेवून पक्षात प्रवेश करणाऱ्या सर्वांचे स्वागत केले. कार्यक्रमाला विविध क्षेत्रांतील मान्यवरांची लक्षणीय उपस्थिती लाभली.


Post a Comment

Previous Post Next Post