धोकादायक इमारतीच्या गॅलरीचा भाग कोसळला



इमारत केली रिकामी ; रहिवाशांना भोगवाटाधारक पत्र 

डोंबिवली \ शंकर जाधव : धोकादायक इमारतीच्या दुसऱ्या व तिसऱ्या मजल्यावरील बाहेरच्या बाजूकडील गॅलरीचा भाग कोसल्याने रहिवाशांना पालिका प्रशासनाने ताबडतोब घराबाहेर काढले.सदर इमारतील रहिवाशांना पालिका प्रशासन कडून भोगवाटाधारक पत्र देण्यात आले. हि इमारत १९८९ साली बांधली होती.

जुनी डोंबिवली रिक्षा थांबा येथील तुकाराम निवास हि तळ - मजला अधिक पाच मजले अशी  ३७ वर्षाच्या इमारतीचा सागर ठाकूर हे मालक आहेत.या इमारतीत एकूण ३० कुटुंबं राहते होते. पालिका प्रशासनाने या इमारतीला धोकादायक इमारत म्हणून घोषित केले होते. येथील काही कुटुंब इमारतीतील घर रिकामे करून दुसरीकडे राहण्यास गेले होते. तर सात ते आठ कुटुंबंच या इमारतीत राहत होते.

  गुरुवार २ तारखेला दुपारच्या दरम्यान या इमारतीच्या दुसऱ्या व तिसऱ्या मजल्यावरील बाहेरच्या बाजूकडील गॅलरीचा भाग कोसळल्याची घटना घडली. यावेळी पालिका प्रशासनाने खबरदारी म्हणून इमारतीतील त्या कुटुंबियांना इमारती बाहेर सुखरूप बाहेर काढण्यात आले. यावेळी भाजपा नगरसेवक दीपेश म्हात्रे, भाजपा नगरसेविका रसिका कृष्णा पाटील,  भाजपा पदाधिकारी कृष्णा पाटील,सहायक पोलीस आयुक्त डोंबिवली विभाग सुहास हेमाडे, विष्णूनगर पोलीस ठाणे वपोनि राम चोपडे यांसह पालिका उपआयुक्त,सहायक आयुक्त हे घटना स्थळी आले होते.

  रहिवाशांची आवश्यक कागदपत्र पाहून  पालिका प्रशासनाकडून राहिवाशांना भोगवाटाधारक पत्र देण्यात आले.




Post a Comment

Previous Post Next Post