मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा वाढू लागला आहे. चीन, अमेरिका आणि दक्षिण कोरीयासारख्या देशांमध्ये कोरोनाचा प्रभाव वाढत असल्याने भारताततही चिंता व्यक्त केली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव महाराष्ट्रावरही वाढू शकतो या पार्श्वभूमीवर योग्य खबरदारी घेण्याची गरज आहे. दरम्यान राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी महाराष्ट्रातून कोरोना कधीच गेला आहे. ख्रिसमस आणि नवीन वर्षे धुमधडाक्यात साजरे करा. मात्र येत्या 27 तारखेला कोरोनाची जुनी यंत्रणा होती त्याची मॉकड्रिल होणार असल्याचे ते म्हणाले.
वाढत असलेल्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर भारत सरकार सतर्क झाले असून, वेगवेगळ्या उपाययोजना करण्यास सुरुवात झाली आहे. केंद्रीय आरोग्य सचिवांकडून याबाबत एक पत्र राज्यांना पाठवण्यात आलं आहे. आगामी काळात कोणती खबरदारी घेण्यात यावी? याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आलं आहे.
दरम्यान महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत मात्र घाबरण्याचे कारण नसल्याचे सांगत आहेत. ते म्हणाले की, कोरोना महाराष्ट्रातून आऊट झाला आहे. ख्रिसमस आणि नवीन वर्षे धुमधडाक्यात साजरे करा.
Tags
महाराष्ट्र
