- ग्राहक संख्येत वार्षिक ४७.९ टक्क्यांची वाढ
मुंबई : फिनटेक कंपनी एंजल वन लिमिटेडने दमदार कामगिरीची नोंद करत, सक्रिय ग्राहक संख्येच्या निकषावर उद्योगक्षेत्रातील तिसऱ्या क्रमांकाचा सर्वांत मोठा ब्रोकर म्हणून स्थान मिळवले आहे, कंपनीच्या एनएसईवरील सक्रिय ग्राहकांची संख्या ४.२३ दशलक्ष झाली असून, ती मागील वर्षाच्या तुलनेत ४७.९ टक्के अधिक आहे. ग्राहकांना अखंडित अनुभव पुरवण्याच्या दृष्टीने झालेल्या आक्रमक तंत्रज्ञानात्मक प्रगतीच्या जोरावर या डिजिटल-फर्स्ट कंपनीमध्ये मोठी वाढ झाली आहे.
या वर्षाच्या सुरुवातीला, एंजल वनने आपले सुपर ॲप आणण्यास सुरुवात केली. सुरुवातीला हे ॲप आयओएस व वेब यूजर्ससाठी सुरू करण्यात आले. नोव्हेंबर २०२२ मध्ये वापरकर्त्यांना अँड्रॉइड व्हर्जन देऊ करण्यात आले. सुपर ॲप पाच महत्त्वाच्या स्तंभांवर (एसटीएआरएस) विकसित करण्यात आले. सुलभता, पारदर्शकता, उपलब्धता, खात्रीशीरता आणि चपळता हे ते पाच स्तंभ आहेत. याद्वारे क्लाएंट्सना सुरक्षित, विनासायास व व्यक्तिनुरूप गुंतवणूक अनुभव दिला जात आहे.
नोव्हेंबरमध्ये एंजल वनने ग्राहकसंख्येत मागील वर्षाच्या तुलनेत ६६.५ टक्के वाढ साध्य करत ही संख्या १२.१९ दशलक्षांवर नेली. यासाठी कंपनीने ०.३२ दशलक्षांचे एकूण ग्राहक संपादन केले. या फिनटेक कंपनीमध्ये, डिजिटल-फर्स्ट दृष्टिकोन व क्लाएंट्सच्या आयुष्यभराच्या गुंतवणूक गरजांसाठी सहयोग देण्याची वचनबद्धता यांच्या जोरावर, उद्योगक्षेत्राचे चित्र पालटून टाकण्याची क्षमता असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
एंजल वन लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. नारायण गंगाधर म्हणाले, “आम्ही भविष्यकाळाकडे दृष्टी ठेवून नवोन्मेषाच्या मार्गावर चालत आहोत. आम्हाला आमच्या वापरकर्त्यांच्या गरजा समजतात आणि त्यांना अखंडित अनुभव हवा असतो हे सध्याच्या आकडेवारीतून स्पष्ट होते. मिलेनिअल्स व जेन झेडच्या गुंतवणूकविषयक गरजा पूर्ण करणारा सर्वाधिक पसंतीचा ब्रोकर होण्याच्या दिशेने आम्ही उत्क्रांत होत आहोत. आमचे सुपर अॅपही याच हेतूने विकसित करण्यात आले आहे. हा वेग कायम राखण्यास आम्ही उत्सुक आहोत.”

