डोंबिवली पश्चिमेला कायमस्वरूपी आधार सेवा केंद्र सुरू

 


डोंबिवली  \ शंकर जाधव : भाजपा प्रदेशाध्यक्ष तथा डोंबिवली विधानसभा मतदारसंघाचे आमदार रविंद्र चव्हाण यांच्या माध्यमातून डोंबिवली पश्चिमेत नवीन विष्णूनगर पोलीस ठाण्याजवळ कायमस्वरूपी आधार सेवा केंद्र सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांना आता आधारसंबंधित कामांसाठी मोठी सोय उपलब्ध झाली आहे.


या आधार सेवा केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी भाजपा नगरसेविका रसिका कृष्णा पाटील, ज्योती पवन पाटील, हर्षाली हृदयनाथ भोईर, डोंबिवली पश्चिम महिला मंडळ अध्यक्षा प्रिया जोशी, भाजपा पदाधिकारी कृष्णा पाटील, जुनी डोंबिवली पश्चिम मंडळ अध्यक्ष पवन पाटील, हृदयनाथ भोईर, कैलास डोंगरे, मयुरेश शिर्के, मुकेश भोईर यांच्यासह अनेक भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


यावेळी भाजपा नगरसेविका रसिका कृष्णा पाटील म्हणाल्या की, “डोंबिवलीकरांसाठी ही आनंदाची बाब आहे. कायमस्वरूपी आधार सेवा केंद्र सुरू झाल्यामुळे नागरिकांना आधार कार्ड अपडेट, दुरुस्ती तसेच अन्य सेवांसाठी आता अधिक सुलभ आणि तत्पर सुविधा मिळणार आहेत.



Post a Comment

Previous Post Next Post