ठाणे :लोढा या इस्टेट डेव्हलपरतर्फे पलावा सिटीमध्ये भव्य पलावा कार्निवलचे आयोजन करण्यात आले होते. पलावा कार्निवल संगीत, कला व संस्कृतीने भरलेला कार्निवल ठरला. रहिवाशांना स्वादिष्ट फूडचा आस्वाद घेण्यासोबत उत्तम परफॉर्मन्सचे मनोरंजन घेण्याची, विविध कार्यशाळांमध्ये उपस्थित राहण्याची आणि पलावामधील सर्वोत्तम गोष्टींचा अनुभव घेण्याची संधी मिळाली. हा संस्मरणीय अनुभव ठरला.
पलावाच्या पायाभूत सुविधांसहहिरवीगार मोकळी जागा, जागतिक दर्जाच्या शिक्षण, क्रीडा व करमणूकीच्या सुविधांनी पलावाला आंतरराष्ट्रीय शहर बनवले आहे आणि येथील एकमेकांशी घनिष्ठतेने जुडलेल्या समुदायामधून अस्सल भारतीय संस्कृती पाहायला मिळते. २०१६ मध्ये सामुदायिक कार्यक्रम म्हणून सुरू करण्यात आलेले पलावा कार्निवल आज स्मार्ट सिटीमधील सर्वात लोकप्रिय इव्हेण्ट बनला आहे. या कार्निवलच्या दोन दिवसीय इव्हेण्टदरम्यान १५,००० रहिवाशांनी त्यांचे मित्र व नातेवाईकांसह उपस्थिती दाखवली.
पलावा कार्निवलमध्ये भारतातील लोकप्रिय बॉय बँड युफोरियाचा परफॉर्मन्स पाहायला मिळाला. लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये युफोरियाने ‘धूम’, ‘मायरी’ व ‘गल्ली’ अशा काही सर्वात लोकप्रिय गाण्यांवर परफॉर्म केला. संगीतप्रेमींनी पलाश सेन आणि त्यांचे बँडचे परफॉर्मन्स पाहण्याचा आणि ९०च्या दशकामधील मनोरंजनाला उजाळा देण्याचा आनंद घेतला.
या सेलिब्रेशनबाबत बोलतानापलावाचे रहिवासी श्री. उल्हास त्रेहन म्हणाले, "पलावा कार्निवल सुरेख वीकेण्ड इव्हेण्ट होता. या इव्हेण्टचे योग्यरित्या नियोजन करण्यात आले होते आणि मनोरंजन व फूडसोबत युफोरियाचा परफॉर्मन्स सर्वकाही उत्तम होते. मी येथे माझ्या कुटुंबासोबत धमाल केली आणि पलावाचा भाग असल्याने स्वत:ला भाग्यवान मानतो.’’ पलावाचे रहिवासी श्री. आनंद कुमारम्हणाले, "मी कार्निवलमध्ये माझ्या कुटुंबासोबत अद्भुत धमालीचा आनंद घेतला आणि युफोरियाचा परफॉर्मन्स खूपच छान होता. आम्हाला पलावा सिटीचे रहिवासी असण्याचा अभिमान वाटतो आणि पलावा सिटी असे इव्हेण्ट्सचे नियोजन करण्यासंदर्भात आमच्या अपेक्षांमध्येखरी उतरते.’’ पलावा कार्निवल निश्चितच बहुप्रतिक्षित फेस्टिवल बनला आहे आणि यंदा पलावियन्ससाठी हा फेस्टिवल अधिक मनोरंजन व धमालीसह परतला.
