कल्याणमध्ये एकपात्री अभिनय स्पर्धा संपन्न

  • रोटरी क्लब ऑफ न्यू कल्याण आणि बालरंगभूमी परिषद कल्याण यांच्या संयुक्त विद्यमाने 


डोंबिवली : रोटरी क्लब ऑफ न्यू कल्याण आणि बालरंगभूमी परिषद कल्याण यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतीच कल्याणच्या बालक मंदिर शाळेत एकपात्री अभिनय स्पर्धा संपन्न झाली एकूण तीन गटात संपन्न झाली. स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी रोटरीचे प्रकल्प प्रमुख रमेश मोरे, सचिव विजू, ऊन्नीथन,सचिव किरण पाटील,केदार पोंक्षे, अरविंद धोंगडे,नितीन माजकर,आणि बालरंगभूमीचे अध्यक्ष सतीश देसाई , कार्याध्यक्ष शिवाजी शिंदे प्रमुख कार्यवाह सुजाता डांगे, ऊपाध्यक्षा प्रीती बोरकर,कोषाध्यक्ष दीपक चिपळूणकर यांसह परीक्षक गजानन कराळे, सुरेश पवार, अनिल कवठेकर,उमेश भेरे, दीप्ती वाकचौरे, दिव्या शिर्के आदी मान्यवर उपस्थित होते. या स्पर्धेतील 

     बालगटात शर्वांनी बाविस्कर, किशोर गटात निमिषा मोरवन्नकर तर कुमार गटात .गैरी मंजली यांनी प्रथम क्रमांक पटकाविले. या प्रसंगी रोटरीचे रमेश मोरे यांनी रोटरीच्या समाजोपयोगी कार्याची माहिती देताना भविष्यातही विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी अशा स्वरूपाचे विविध उपक्रम राबविण्याची ग्वाही दिली. बालरंग भूमी कार्याध्यक्ष व नाट्य परिषद कल्याण शाखा अध्यक्ष शिवाजी शिंदे यांनी या स्पर्धेसाठी रोटरीने केलेल्या सर्वतोपरी सहकार्याबद्दल आभार मानताना विद्यार्थ्यांचे मनोबल वाढविण्यासाठी समर्थक मार्गदर्शनही केले.

    परीक्षक म्हणून एकूणच या एकपात्री स्पर्धेतील सादरीकरण याविषयी मत मांडताना रंगकर्मी सुरेश पवार यांनी सांगितले की आपण पहिल्या तीन क्रमांकात नाही याचा खेद करण्यापेक्षा आपण तेथे का नाही याचा शोध घ्या. पुढच्या वेळचा विजेता मीच अशी खूणगाठ बांधून आपल्या झालेल्या चुकांवर मात करत यशाची शिखर काबीज करा.तसेच विजेत्यांनीही या यशाने हुरळून न जाता. आज आपलं काम जरी उत्तम झालंय पण भविष्यात ते सर्वोत्तम कसं होईल यासाठी सर्वतोपरी व सातत्यपूर्ण मेहनत करा. परीक्षक अनिल कवठेकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज, सावित्रीबाई फुले या भूमिकेत इथे बराच वेळ वावरत आहात पण पुढील आयुष्यातही त्यांच्याच आदर्शावर चालण्याचा प्रामाणिक प्रयत्न करा यश तुमच्याकडे चालत येईल. 

 याप्रसंगी सुत्रसंचालनाची जबाबदारी सुजाता डांगे व मंगेश घाटे यांनी सांभाळली.स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी कैलास सरोदे, पांडुरंग भारती, विशाल पितळे,ऐश्वर्या भरगुडे, मीनल ठाकोर, नंदिनी कुलकर्णी,मेघा शृंगारपुरे,सौरभ आरोटे,हर्षदा बोरवनकर .यांनी विशेष परिश्रम घेतले स्पर्धेतील सहभागी विद्यार्थ्यांनाही मान्यवरांच्या हस्ते सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले.

  • विजेत्यांची नावे बालगट

द्वितीय क्रमांक: भैरवी जोशी

तृतीय क्रमांक: पूर्वा सोनवणे

उत्तेजनार्थ: शुभ्रा डायघर, स्वरूप कांबळे, आदिराज सुर्वे, स्वरा ताम्हणकर, अवंतिका घोंगे.             

  • किशोर गट 

द्वितीय क्रमांक: आर्या हिवाळे

तृतीय क्रमांक: मंजिरी महाडिक

उत्तेजनार्थ: तनुष्का नेवे, ईशान मलबारी, श्रेया शिंपी, अथर्व भागवत, आर्य स्तळ

  • कुमार गट

द्वितीय क्रमांक: अनय बुद्धीकोट

तृतीय क्रमांक: नवीन सेलपी

उत्तेजनार्थ: मंथन चौहान ,समृद्धी कदम, चारुता राणे, हर्ष भंडारे, समीक्षा खोले.



Post a Comment

Previous Post Next Post