सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी संप्रदायाचा सिंधुदुर्ग संतसेवा पुरस्कार प्रदान

सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी संप्रदायसिंधुदुर्ग च्यावतीने दरवर्षी देण्यात येणारे मानाचे संतसेवा पुरस्कार २०२२ यावर्षी ह.भ.प.सिताराम परब आंब्रड ता.कुडाळ,ह.भ.प.गणपत पांचाळ आखवणे ता.वैभववाडीह.भ.प.रामचंद्र गाड सासोली ता.दोडामार्ग यांना प्रदान करण्यात आले. 

सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी संप्रदायाचा जिल्हा वारकरी मेळावा रविवार25 डिसेंबर 2023 रोजी सावंतवाडी येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला ह.भ.प. गाड महाराज (दोडामार्गसावंतवाडी)ह.भ.प. सिताराम परब महाराज (आंब्रडता. कुडाळ)ह.भ.प. गणपत पांचाळ महाराज (वैभववाडीकणकवली) हे यंदाचे मानकरी होते. तसेच यावेळी वारकरी दिनदर्शिकेचेही प्रकाशन करण्यात आले.
  या मेळाव्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी संप्रदायांतर्गत काही पदाधिकाऱयांची निवड करण्यात आली. त्यात सावंतवाडी युवा अध्यक्षपदी ह.भ.प. केतन सावंत (रा. कुणकेरी) व वैभववाडी तालुका अध्यक्षपदी ह.भ.प. तुषार पवार (मृदंगमणी) यांचा समावेश आहे. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा युवा अध्यक्ष ह.भ.प. पंढरीनाथ सावंत तसेच सावंतवाडी तालुका अध्यक्ष व सर्व तालुक्यांचे अध्यक्ष व पदाधिकारी आणि जिह्यातील सर्व वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. महाप्रसादानंतर वारकरी मेळाव्याची सांगता झाली.

सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी संप्रदायाचे जिल्हा अध्यक्ष ह.भ.प. विश्वनाथ महाराज गवंडळकरकार्याध्यक्ष ह.भ.प. रामचंद्र कदम महाराजउपाध्यक्ष ह.भ.प. सावळाराम कुर्ले महाराजखजिनदार ह.भ.प. मधुकर प्रभूगांवकर महाराजजिल्हा सचिव राजू राणे व इतर पदाधिकारी आणि सिंधुदुर्ग जिह्यातील वारकरी व नागरिक आदी या मेळाव्याला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post