महाराष्ट्राच्या मुलींची सिक्कीमवर मात 

 ४१ वी कुमार मुली (ज्युनिअर) राष्ट्रीय अजिंक्यपद खोखो स्पर्धा

बन्सबेरिया (पश्चिम बंगाल) : पश्चिम बंगालमधील बन्सीबेरी येथील खामरपारा सिशू संघ मैदानावर हे सामने सुरु आहेत. सकाळच्या सत्रात झालेल्या साखळी सामन्यात महाराष्ट्र मुलींच्या संघाने सिक्कीमचा  डाव १८ गुणांनी (२३-५असा धुव्वा उडवला. ४१ व्या राष्ट्रीय कुमार-मुली खो-खो स्पर्धेत महाराष्ट्राच्या मुलींच्या संघाने सिक्कीमचा सहज पराभव करत साखळी सामन्यातील पहिला विजय मिळवला.

या सामन्यात दीपाली राठोड ( मी. संरक्षण व  गुण)संपदा मोरे (.३० मि.संरक्षण व  गुण )काजल शेख ( मि. संरक्षण व  गुण )प्रणाली काळे (.३० मि. संरक्षण)कल्याणी कंक (.३० मिनीट संरक्षण व  गुण)सोनाली पवार ( मिनिटे संरक्षण व  गुण) यांनी शानदार खेळाचे प्रदर्शन केले. पराभूत सिक्कीम संघातर्फे मारियामोरेशी यांनी चांगला खेळ केला.

उर्वरित मुलींच्या सामन्यात कर्नाटकने विदर्भचा (१८-११असा ७ गुणांनी पराभव केला. तसेच आसामने दादरानगर हवेलीचा (२९-२असा एक डाव २७ गुणांनीमणिपूरने जम्मू काश्मीरचा (१७-६असा एक डाव ११ गुणांनीपोंडिचेरी ने चंदीगड चा (१३-२असा एक डाव ११ गुणांनी पराभव केला. 

कुमार गटात आसामने बिहारचा (२२-८असा  डाव १४ गुणांनीकेरळने दादरा नगर हवेलीचा (२३-६असा एक डाव १७ गुणांनी,  चंदीगडने त्रिपुराचा (१४-१३एक गुण ६.२० मिनिटे राखून विजय मिळवला.

दरम्यानखो-खो फेडरेशनचे सहसचिव डॉ. चंद्रजीत जाधव आणि महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे सचिव अ‍ॅड.गोविंद शर्मा यांनी महाराष्ट्र मुली आणि कुमार संघातील खेळाडू आणि प्रशिक्षक यांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या

Post a Comment

Previous Post Next Post