- जल तपासणी प्रयोगशाळा उभारण्याचा महापालिकेचा प्रयत्न
डोंबिवली : दूषित पाण्यामुळे कावीळ, अतिसार, गॅस्ट्रोसारखे आजार पसरण्याचा सर्वाधिक धोका असतो, त्यामुळे दूषित पाण्यामुळे होणाऱ्या आजारांना आळा घालण्यासाठी महापालिका आता स्वतःचीच सुसज्ज अशी जल तपासणी प्रयोगशाळा उभारण्यासाठी प्रयत्न करीत असल्याची माहिती शहर अभियंता अर्जुन अहिरे यांनी दिली.
सदयस्थितीत महापालिका क्षेत्रातील पाण्याचे नमुने हे पाणी ,कितपत शुद्ध आहे, त्यामध्ये काही विषाणूंचा प्रादुर्भाव तर नाही इ. गोष्टी तपासण्यासाठी दर एक दिवसाआड कोकण भवन येथील शासनमान्य प्रयोगशाळेत पाठविले जातात. तथापि या नमुन्याचे अहवाल प्राप्त होण्यासाठी साधारणपणे दोन ते तीन दिवसांचा अवधी लागत असल्याने सदर पाण्याच्या गुणवत्तेची माहिती मिळण्यासाठी थोडा कालावधी लागतो.
परंतु पावसाळ्यात साथीचे आजार पसरण्याची शक्यता जास्त असल्यामुळे महापालिका प्रशासनास पाणी पूरवठयाबाबत अधिक काळजी घ्यावी लागते. मात्र पाण्याच्या गुणवत्तेचे अहवाल प्राप्त होण्यास लागणारा विलंब पाहता हे अहवाल तातडीने प्राप्त होण्यासाठी आता स्वतःचीच सुसज्ज जल तपासणी प्रयोगशाळा उभारण्यासाठी प्रयत्न करीत असल्याची माहिती शहर अभियंता अर्जुन अहिरे यांनी दिली.
नागरिकांना दररोज पुरविण्यात येणारे पाणी पिण्यायोग्य असल्याची खात्री करण्यासाठी दररोज पाण्याचे नमुने घेऊन त्याची गुणवत्ता व ते पाणी पिण्यायोग्य आहे की नाही याची तपासणी त्याच दिवशी करून आवश्यकता असल्यास दुस-या दिवशी कार्यवाही होणे आवश्यक आहे, यासाठी याबाबत सर्वंकष विचार करून महापालिका प्रशासनाकडून पाणी तपासणीसाठी सुसज्ज प्रयोगशाळा उभारण्यात येणार आहे.

दरम्यानच्या काळात पाण्याच्या नमुन्यांचा अहवाल तातडीने मिळण्यासाठी महापालिका नजीकच्या शासन मान्यता प्राप्त खाजगी लॅबचे दर प्राप्त करुन न्युनतम दराने पाण्याचे नमुने तपासून अहवाल देण्या-या जल तपासणी लॅबची माहिती उपलब्ध करून घेणेबाबत अभियंता वर्गास निर्देश दिले असून पाणी नमुने तपासणी करतांना सर्व प्रकारच्या प्राथमिक व Bactereological तपासण्या करण्यात याव्यात, प्रतेक प्रभागातील किमान १० ठिकाणचे पाणी नमुने घेण्यात यावेत आणि पाणी नमुने टॅप वॉटरचे (नळाचे) असले पाहिजेत याची दक्षता घ्यावी, आरोग्य विभागाने देखील घेतल्या जाणा-या नमुन्याबाबत अशी कारवाई करावी असे निर्देश शहर अभियंता अर्जुन अहिरे यांनी दिले आहेत.
Tags
महाराष्ट्र