राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू डोंबिवलीत येणार

   

 डोंबिवली : डोंबिवली शहरातील नामवंत पै फ्रेंड्स लायब्ररी तर्फे दिनांक २० जानेवारी ते २९ जानेवारी २०२३ ह्या कालावधीत बहुभाषीय पुस्तक आदान प्रदान सोहळा आयोजित केला आहे.या सोहळ्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उपस्थित राहणार आहे.

    वाचन संस्कृती वृद्धिंगत करणाऱ्या ह्या पुस्तक सोहळ्यात उपस्थित राहण्यासाठी  खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे, पै फ्रेंड्स लायब्ररीचे संचालक  पुंडलिक पै, श्री गणेश मंदिर संस्थान डोंबिवली चे कार्यवाह तसेच सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेले  प्रवीण दुधे, आणि  दिपाली काळे यांनी दिल्ली येथील राष्ट्रपती भवनात प्रत्यक्ष राष्ट्रपती  द्रौपदी मुर्मू ह्यांची भेट घेतली.  राष्ट्रपतींना पुस्तक आदान प्रदान 2023 चे सस्नेह निमंत्रण देण्यात आले आहे.कार्यक्रमाची सविस्तर रूपरेषा आणि उदात्त हेतू समजून घेतल्यानंतर येत्या काळातील महाराष्ट्र दौऱ्यात पुस्तक आदान प्रदान सोहळ्याला भेट देण्याची शक्यता असल्याचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू ह्यांनी संचालक पुंडलिक पै यांना सांगितले.



Post a Comment

Previous Post Next Post