-
वसईमध्ये मालिकेच्या सेटवरच घेतला गळफास
मुंबई :
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्मा हिने टीव्ही शोच्या सेटवरच गळफास घेत आत्महत्या केल्याची खळबळजनक
घटना घडली आहे.नायगावमध्ये
चित्रीकरणाची तयारी करीत असताना अचानक आत्महत्या
का केली याचा पोलीस तपास करत आहेत.
अभिनेत्री तुनिषा सोशल मीडियावरही खूप सक्रिय होती,इन्स्टाग्रामवर तिचे 1 मिलियन फॉलोअर्स आहेत.
सोशल मीडियावर ती नेहमी सक्रीय असे. ती चाहत्यांसाठी फोटो आणि व्हिडिओ पोस्ट
करत असे. मृत्यूच्या काही तास आधी तिने शेवटची पोस्ट शेअर केली होती.तुनिषा
केवळ २० वर्षांची होती.'भारत का वीर पुत्र महाराणा प्रताप'या टीव्ही मालिकेतून त्यांनी करिअरची सुरुवात केली. यानंतर त्यांनी'चक्रवर्ती अशोक सम्राट', 'गब्बर पुंचवाला', 'शेर-ए-पंजाब :
महाराजा रणजीत सिंह', 'इंटरनेट वाला लव', 'इश्क सुभानल्ला'मध्ये काम केले.
तुनिषा सध्या सोनी सब टीव्ही मालिका अली बाबा: दास्तान-ए-काबुलमध्ये राजकुमारी
मरियमची भूमिका साकारत होती. तिने अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये देखील काम केले
होते. तिने सलमान खान, कतरिना कैफ यांच्याबरोबर स्क्रीन शेअर केली आहे. तुनिषा ‘फितूर’, ‘बार बार देखो’, ‘कहानी-2: दुर्गा रानी सिंह’, दबंग ३ मध्ये
तुनिशाने एका छोट्या भूमिकेत दिसली होती. तिने ‘फितूर’ आणि ‘बार बार देखो’ मध्ये तरुण कतरिना कैफची भूमिका साकारली होती.
