मनसे देणार जिल्हा परिषदेच्या शाळांकडे लक्ष

 डोंबिवली : कोणत्याही पक्षाचा पदाधिकारी किंवा कार्यकर्त्याचा वाढदिवस साजरा करताना मोठ्या जल्लोषात साजरा होत असताना पाहतो. मात्र डोंबिवलीतील एका मनसैनिकाने जिल्हा परिषदेचा शाळेत जाऊन विद्यार्थ्याबरोबर वाढदिवस साजरा केला. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे शहर अध्यक्ष मिलिंद म्हात्रे यांनी डोंबिवली पुर्वेकडील आजदेगाव येथील शाळेत विद्यार्थ्यामध्ये भारतीय बैठकीनुसार बसून गप्पा मारल्या. विशेष म्हणजे शाळेत अनेक अडचणी प्रशासना करतेय तरी काय असा प्रश्नहि उपस्थित केला.मनसे याकडे लक्ष देऊन जिल्हा परिषदेच्या शाळामध्ये आवश्यक साहित्य, सुविधा देण्याच आश्वासन दिले.
      सुखद अनुभव आणि बालपणीचे दिवस यात रमताना महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे शहर अध्यक्ष म्हात्रे यांनी आजदे गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षकांशी शाळेच्या परिस्थितीबाबत चर्चा केली. शाळेच्या परिस्थितीची माहिती ऐकताच म्हात्रे यांना आश्चर्य वाटले.केंद्र सरकारचे आणि पालिका प्रशासनाने या शाळेकडे लक्ष दिले नसल्याने शाळेची अशी अवस्था झाल्याचे म्हात्रे यांनी सांगितले. त्यानंतर शाळेतील विद्यार्थ्याबरोबर गप्पा मारल्या.विद्यार्थ्यांना शालेय साहित्य आणि खाऊ मिळाल्याने त्याच्या चेहऱ्यावरील हास्य पाहून म्हात्रे आनंदी झाले. प्रेम पाटील,प्रीतेश पाटील,प्रकाश भालेराव,सुमेधा थत्ते,गौरी कुरतडकर यांसह मनसैनिकांना म्हात्रे यांना शुभेच्छा दिल्या.



Post a Comment

Previous Post Next Post