मुंबई : ख्रिसमस तोंडावर असतानाच अनेकांनी आपल्या माणसांना भेटण्यासाठीचे बेत आखले आहेत. त्यातही रविवार हा सुट्टीचा दिवस असल्यामुळे हे बेत आणखी धमाकेदार कसे करावेत याचाच विचार अनेकजण करू लागले आहेत. पण, यावर विरजण पडू शकतं. कारण, ऐन नाताळच्या दिवशी मुंबईकरांपुढे संकट असेल ते म्हणजे मेगा ब्लॉकचे.
रविवारी मेगाब्लॉक : रेल्वेच्या यांत्रिकी कामांसाठी रविवारी मध्य रेल्वेवर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) ते विद्याविहारदरम्यान दोन्ही धीम्या मार्गावर १०.५५ ते दुपारी ३.५५ वाजेपर्यंत आणि उपनगरीय मार्गावर वडाळा रोड ते मानखुर्द स्थानकांदरम्यान दोन्ही मार्गांवर सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेपर्यंक मेगाब्लॉक असेल. ज्यामुळं मुंबईकरांच्या प्रवासात अडथळा येऊ शकतो. पश्चिम रेल्वेवर शनिवारी रात्री Block घेण्यात येणार आहे. मुंबई सेंट्रल-माहीमदरम्यान दोन्ही जलद मार्गावर हा ब्लॉक असेल. रविवारी या मार्गावर मेगाब्लॉक होणार नाही. असे असले तरीही लोकल रेल्वे वेळापत्रकानुसारच धावतील असे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
