आपला भारत देश हा कृषिप्रधान देश आहे कृषी हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे देशाची अर्थव्यवस्था व विकासदर शेतीच्या उत्पादकतेवर अवलंबून असतो आजही देशात ६०% लोकसंख्येला कृषी क्षेत्र रोजगार उपलब्ध करून देते म्हणजे एकूण ६०% लोक हे शेती व्यवसायावर अवलंबून आहेत आपल्या महाराष्ट्र राज्याचा विचार करायचा म्हटला तर राज्यात साधारणता ६७ लाख शेतकर्यांकडे एक हेक्टर एवढे जमिनीचे क्षेत्र आहे तर ४० लाख शेतकर्यांकडे एक ते दोन हेक्टर इतके जमिनीचे क्षेत्र आहे२ २२ लाख शेतकर्यांकडे दोन ते चार हेक्टर एवढे जमिनीचे क्षेत्र आहे ७ लाख शेतकर्यांकडे चार ते दहा हेक्टर ऐवढे जमिनीचे क्षेत्र आहे आणि दहा हेक्टर पेक्षा जास्त जमिन क्षेत्र असणारे अत्यंत अल्प शेतकरी आपल्या राज्यात आढळतात यातले बरेचसे जमिनीचे क्षेत्र पावसाच्या पाण्यावर अवलंबून असल्यामुळे खात्रीशीर उत्पादनाची कुठलीही शाश्वती शेतकर्याला नसते.
कृषी व कृषी सलग्न क्षेत्रातील विकसित कुशल मनुष्यबळ, तंत्रज्ञानामुळे देशात हरितक्रांती, धवलक्रांती, पीतक्रांती, साध्य झाली आणि आपण अन्नधान्य, दुध, तेलबिया, कडधान्य, फळे यामध्ये स्वयंपूर्ण झालो बदलत्या परिस्थितीत उत्पादकता वाढविणे, कृषी उत्पादनांना स्थैर्य प्राप्त करून देणे व हवामान बदल, वाढती लोकसंख्या या समस्यांचा सामणा करणेसाठी शाश्वत अन्नधान्य सुरक्षा स्थैर्यता प्राप्त करणेच्या दृष्टीने कृषी क्षेत्राला एक अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे.
शेती हा व्यवसाय शास्त्र आणि कला कौशल्य वर आधारित आहे म्हणून शेती शास्त्राची आणि त्यातील कौशल्याची माहिती करुन घेणे शेतकर्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे. सर्वसाधारणता १००० ते १५०० लोकसंख्या असलेल्या गावात आरोग्याच्या दृष्टीने २ ते ३ उच्चशिक्षित डॉक्टरांची गरज असते तसेच ३ ते ४ कृषी पदवीधर स्वतः शेती करीत असतील तर तर त्यांच्या ज्ञानाचा आणि अनुभवाचा गावातील शेतकर्यांना फारदा होईल शेतीचे हंगामानुसार नियोजन करणे गरजेचे आहे या साठी कृषिविषयक ज्ञानाची व माहितीची गरज आहे..
मध्यंतरी उच्च नोकरी, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ शेती अशी संकल्पना रुजली म्हणून मग शेती कोणी करावी? तर जो अभ्यासात थोडा कमी आहे अशी कल्पना मध्यंतरीच्या काळात रुजली उच्चशिक्षित वर्गाने पाठ फिरवली खरे तर शेती म्हणजे अभ्यासाचा प्रचंड बुद्धिमत्तेने करण्याचा व्यवसाय आहे यात असंख्य अडचणी, संकटे असल्याने निर्णय घेतांना कस लागतो शेतीचे महत्त्व आता पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे कोरोना काळात तर अनेकांना शेती आणि शेतीशी निगडित व्यवसायानेच तारले आहे कृषी शिक्षणाला सध्या पुन्हा एकदा महत्त्व प्राप्त होत आहे देशभरात गेल्या पंचाहत्तर वर्षात अनेक कृषी विद्यापीठांची स्थापना झाली आहे वर्षे २०२१ पर्यन्त देशभरात तीन राष्ट्रीय आणि ६३ राज्यस्तरीय कृषी विद्यापीठ कार्यरत असून या विद्यापीठांना असंख्य महाविद्यालय जोडलेल्या आहेत यातून निर्माण होणारे कृषी पदवीधर कृषी सलग्न व्यवसाय किंवा प्रत्यक्ष शेतीत शेतीत कार्यरत आहेत कृषी शिक्षण घेवून शास्त्रशुद्ध पद्धतीने शेती करणार्या तरुणांची वाढत असणारी संख्या शेती क्षेत्रासाठी आशादायी गोष्ट आहे. महाराष्ट्रातील कृषी विद्यापीठानमध्ये सातत्याने नवीन नवीन कृषी तंत्रज्ञाविषयी संशोधन सुरू असते शेतकऱ्यांना नवीन नवीन कृषी तंत्रज्ञानाची माहिती व्हावी व उपलब्ध कृषी तंत्रज्ञानाचा शेतकऱ्यांना पुरेपूर वापर करावा यासाठी राज्याने कृषी विभागामार्फत कृषी विद्यापीठे व सलग्न महाविद्यालय माहिती प्रसारित व शेतकर्यांमार्फत पोहचवत असतात शेतकऱ्यांना विद्यापिठांमार्फत नवीन नवीन तंत्रज्ञानामार्फत व आधुनिक तंत्रज्ञान वापराबाबत प्रशिक्षित केले जाते ग्रामीण व शहरी भागातील मुलांनी कृषी शिक्षणाकडे पसंती दिली तर याचा निश्चित आपल्याला फायदा होईल.. जागतिक शैक्षणिक स्पर्धेत भावी युवा पिढीसाठी कृषी शिक्षण हे एक महत्त्वाचे व्यासपीठ खुले झाले आहे कृषी क्षेत्रातील अमुलाग्र बदल नवनवीन तंत्रज्ञान या बाबींचा विचार करता शेतीच्या शास्वत भवितव्याचा विचार करता कृषी व कृषी सलग्न उदा. कृषी उद्यानविद्या , कृषी जैवतंत्रज्ञान, कृषी अभियांत्रिकी, अन्न तंत्रज्ञान, कृषी व्यवसाय व्यवस्थापन, मत्स्यव्यवसाय, वनशास्त्र, पशुसंवर्धन, या विषयातील प्रशिक्षित मनुष्यबळ निर्माण करणे काळाची गरज आहे
आजमितीला भारतीय कृषी अनुसंधान परिषदेतंर्गत एकूण ६४ राज्य कृषी विद्यापाठे ४ अभिमत विद्यापीठ ३ केंद्रीय कृषी विद्यापीठ व ४ केंद्रीय विद्यापीठ कार्यरत आहेत तर महाराष्ट्रात ४ कृषी विद्यापीठात ३८ घटक कृषी व सलग्न महाविद्यालये व १५२ कृषी आणि कृषी संलग्न विनाअनुदानित महाविद्यालयातून एकूण १५,३३७ विद्यार्थ्यांना कृषी व कृषी संलग्न अभ्यासक्रमांना प्रवेश देण्यात येतो त्यामुळे मोठ्या प्रमाणावर कृषी क्षेत्रामधील कुशल मनुष्यबळ तयार होत आहे.
✍️ संकेत शिरसाठ
डॉ उल्हास पाटील कृषी महाविद्यालय जळगांव.
.jpeg)