मुंबई, : भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) वांद्रे पूर्व येथील मुख्यालयात 'म्हाडा'चे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल डिग्गीकर यांच्या हस्ते आज ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी डिग्गीकर यांनी प्रजासत्ताक दिनाचे महत्व विशद करताना 'म्हाडा' ही सार्वजनिक संस्था असल्याने प्रत्येक कर्मचाऱ्याचे नागरिकांप्रती उत्तरदायित्व अधिक असल्याचे सांगितले.
या प्रसंगी मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाचे मुख्य अधिकारी अरुण डोंगरे, मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद बोरीकर, 'म्हाडा'चे मुख्य अभियंता-२ सुनील जाधव, मुख्य अभियंता-३ शिवकुमार आडे, मुंबई मंडळाच्या सहमुख्य अधिकारी नीलिमा धायगुडे, मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळाचे मुख्य अधिकारी रवींद्र पाटील, म्हाडाचे सचिव राजकुमार सागर, वित्त नियंत्रक दिग्विजय चव्हाण, उप विधी सल्लागार एस. एन. खोब्रागडे, विकास रसाळ, उपमुख्य अभियंता (पीपीडी) सुधीर पाटील, उपमुख्य अभियंता संतोष बोबडे, कार्यकारी अभियंता पी. बी. सानप, कार्यकारी अभियंता संजय जाधव, निलेश मडामे, मुख्य जनसंपर्क अधिकारी वैशाली गडपाले, आदींसह म्हाडातील अधिकारी-कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Tags
महाराष्ट्र
