महावितरणच्या भांडुप परिमंडलात प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा
भांडुप : भारतीय प्रजासत्ताक दिनाचा ७३ वा वर्धापन दिन महावितरण भांडुप परिमंडलाच्यावतीने मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. राष्ट्रीय ध्वजाचे ध्वजारोहण मुख्य अभियंता, भांडुप परिमंडल सुनील काकडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अधीक्षक अभियंता, शुभांगी कटकधोंड, सहाय्यक महाव्यवस्थापक (वि व ले) प्रवीण रहांगदळे, सहाय्यक महाव्यवस्थापक (मा. सं) हविषा जगताप, कार्यकारी अभियंता (स्थापथ्य) प्रवीण काळे, कार्यकारी अभियंता(प्रशा.) देवेंद्र उंबरकर, प्रणाली विश्लेषक रामकृष्ण वराडे व इतर वरिष्ठ अधिकारी व कर्मचाऱ्यांनी राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली.
२६ जानेवारी २०२३ रोजी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून नव्याने उभारणी केलेल्या इलेक्ट्रिक वेहिकल चार्जिंग स्टेशन पायोनियर उपकेंद्र, GMLR रोड नजिक मुलुंड (पूर्व) चे लोकार्पण मुख्य अभियंता, काकडे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. तसेच मिठानगर रोड शाखा कार्यालयाचे नवीन जागेत स्थलांतर करून त्याचे उदघाटनही करण्यात आले.
सदर इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग केंद्रामध्ये एका वेळेस 3 कार चे चार्जिंग करण्याची सोय, कमीत कमी वेळामध्ये ( Fast Charger) व कमी दरामध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे. मुख्य अभियंता यांनी आवाहन केले की मुलुंड मधील सर्व ग्राहकांनी या सेवेचा वापर करावा व हरित ऊर्जेचा वापर करून पर्यावरण रक्षणासाठी आपले हातभार लावावे.
यावेळी, ठाणे मंडळाचे अधीक्षक अभियंता. अरविंद बुलबुले, शुभांगी कटकधोंड, कार्यकारी अभियंता मुलुंड दत्तात्रय भणगे सुरेश सवाईराम, सुनील माने, अनिलकुमार पाटील मुलुंड व भांडुप परिमंडळातील वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
