दिव्यातील श्री साईबाबा ट्रस्टचा ९ वर्धापन दिन उद्यापासून

दिवा : श्री साईबाबा मंदिर देवस्थान चॅरीटेबल ट्रस्टच्या वतीने ९ वा वर्धापन दिन सोहळा व महा साई भंडारा २२ जानेवारी ते २६ जानेवारी २०२३ पर्यंत दिव्यातील बेडेकर नगर येथे संपन्न होत आहे. श्री नरेश पवार व रेश्मा पवार यांच्या शुभहस्ते श्री गणेश पूजन, साई अभिषेक व देवपूजा होणार आहे. 

सदर पाच दिवसीय उत्सवात पारायण, भजन व हरिपाठ, विद्यार्थी गुणगौरव व बक्षीस समारंभ , विविध सामाजिक, सांस्कृतिक, आंतरशालेय नृत्य स्पर्धा, ज्येष्ठ नागरिक सत्कार, प्रजासत्ताक दिन सोहळा, बक्षीस समारंभ, होम हवन व सत्यनारायण पूजा, हळदी कुंकू व प्रमुख पाहुणाचे स्वागत आणि सत्कार होणार आहेत.

श्री नरेशजी पवार संस्थापक, श्री साईबाबा चॅरिटेबल ट्रस्ट, सौ. रेश्मा नरेश पवार अध्यक्षा नरेश्मा फाउंडेशन, आयोजक यज्ञेश नरेश पवार, संयोजक चिन्मय नरेश पवार, नियोजक श्री साई सेवा मंडळ दातिवली, व्यवस्थापन ॐ साई ग्रुप, ॐ साई महिला मंडळ, नामदेव नाईक, भूषण पाटील, डॉन भोईर. ग्रामस्थ दातिवली, दिवा, आगासन, साबे, म्हातार्डी, बेतवडे, संदप, खर्डी, शिळ, डायघर, निळजे, देसाई, मानपाडा, सोनारपाडा. तसेच पंचक्रोशीतील जनतेने सोहळ्याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post