दिवा : कोयना पुनर्वसन गावातील क्षत्रिय मराठा नागरिकांच्या समाज उपयोगी कारकिर्दी करिता स्थापन करण्यात आलेल्या कोयना क्षत्रिय मराठा समाज सेवा संघ मागील कित्येक वर्षापासून कार्य करत आहे. या संस्थेच्या प्रसिद्धी प्रमुख पदी अमोल कदम यांची शनिवारी झालेल्या कार्यकारिणीच्या बैठकीत सर्वानुमते निवड करण्यात आली.
अमोल कदम यांचा पत्रकार शेत्रात असलेला ठसा आणि त्यांचे सामाजिक कार्य उल्लेखनीय आहे. या कार्याचा कोयना क्षत्रिय मराठा समाजाला देखील उपयोग होऊन आपल्या समाजाची बांधिलकी म्हणून कोयना क्षत्रिय मराठा सेवा संघ महाराष्ट्र राज्याच्या प्रसिद्धी प्रमुख पदी पत्रकार अमोल कदम, गाव करंजवडे यांची निवड करण्यात आली.
शनिवार दिनांक २१ जानेवारी २०२३ रोजी झालेल्या बैठकीत कोयना क्षत्रिय मराठा सेवा संघाचे अध्यक्ष विजय मोरे, सरचिटणीस सुरेश साळवी, अरुण कदम यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच पुढील वाटचालीस शुभेचछा देण्यात आल्या.
