नवी मुंबई प्रीमिअऱ लीगमध्ये खेळण्याची संधी



मुंबई : नवी मुंबई आणि ठाणे जिल्ह्यातील युवा क्रिकेटपटूंना त्यांचे कौशल्य दाखवण्यासाठी लवकरच नवी मुंबई प्रीमिअर लीग घेण्यात येणार आहे. आठ फ्रँचायझीचा समावेश असलेल्या या लीगमध्ये फक्त महाराष्ट्राचे खेळाडू सहभाग घेऊ शकणार आहेत. 

  आयपीएलच्या धर्तीवर होणाऱ्या या लीगमध्ये अनेक नामवंत क्रिकेटपटूंसोबत खेळण्याची संधी युवा खेळाडूंना मिळणार आहे. त्यांना ट्रायल द्यावे लागणार आहे आणि त्यासाठी nmplt20.com या संकेतस्थळावर खेळाडूंना नाव नोंदवावे लागणार आहे. ३० व ३१ जानेवारी २०२३ मध्ये बेलापूर स्पोर्ट्स संघटनेच्या क्रिकेट मैदानावर हे ट्रायल घेतले जाणार आहेत. नवी मुंबई प्रीमिअऱ लीगचे चेअरमन शाहआलम शेख यांनी सांगितले की, या लीगसाठी १६ वर्षांवरील मुले नाव नोंदणी करू शकतात आणि ८ संघांचा समावेश असलेल्या या लीगमध्ये एकूण १६० खेळाडू खेळतील.

 देशातील युवकांना त्यांचे कौशल्य दाखवण्यासाठी फार कमी व्यासपीठ आहेत आणि नवी मुंबई प्रीमिअर लीगच्या माध्यमातून चांगल्या खेळाडूंना हे व्यासपीठे देणे, हे आमचे पहिले ध्येय आहे. त्यांच्या क्रिकेट कारकीर्दिच्या पंखांना आम्हाला बळ द्यायचे आहे.

Post a Comment

Previous Post Next Post