‘अपोलो जेनोमिक्स इंस्टिट्यूट’ मुळे महिला-मुलांच्या आरोग्यावर सकारात्मक परिणाम होईल - शर्मिला टागोर

 


अभिनेत्री शर्मिला टागोर यांच्या हस्ते 'जीनोमिक्स इन्स्टिट्यूट' चे उद्घाटन

नवी मुंबई, १६ जानेवारी २०२३: नवी मुंबईतील अपोलो हॉस्पिटल्सने आज अनुवांशिक विकार असलेल्या रुग्णांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना सर्वसमावेशक वैद्यकीय सेवा प्रदान करण्यासाठी अपोलो जेनोमिक्स इंस्टीट्यूट्सची स्थापना केली आहे. जेनोमिक अनुवांशिक विकारांशी संबंधित आहे तसेच यामुळे दुर्मिळ आणि अनुवांशिक रोगांचे निदान आणि उपचार करण्यात मदत होते. यामुळे एखाद्या व्यक्तीला रोग होण्याच्या जोखमीबद्दल आणि विशिष्ट उपचारांना त्यांच्या प्रतिसादाबद्दल माहिती देखील प्रदान केली जाऊ शकते आणि म्हणून अचूक व वैयक्तिकृत औषधोपचार करता येतात. अपोलो जेनोमिक्स इंस्टिट्यूटमुळे व्यक्तीला, जोडप्यांना आणि कुटुंबीयांना जनुकीय विकारांचे वैद्यकीय, मानसिक, कौटुंबिक आणि पुनरुत्पादक परिणाम समजून घेण्यास मदत होईल. अपोलो जेनोमिक्स इन्स्टिट्यूटमधून मोठ्या लोकसंख्येला अनुवांशिक विकार, असामान्य अनुवांशिक चाचण्या, उशीरा वाढणारी मुले, जन्मजात विसंगती याबाबत आणि अनुवांशिक अस्वस्थता असलेल्या कुटुंबातील सदस्यांना देखील लक्षणीयरित्या फायदा होईल.

आनुवांशिक विकारांवरती योग्य वेळी उपचार करून घेण्याचे आवाहन बॉलिवूड अभिनेत्री शर्मिला टागोर यांनी अपोलो हॉस्पिटलच्या पत्रकार परिषदेमध्ये केले. दिल्लीवरून व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे शर्मिला टागोर यांनी पत्रकारांशी आणि अपोलो हॉस्पिटलच्या वरिष्ठ डॉक्टर यांच्या सोबत संवाद साधला! नवी मुंबईमध्ये प्रत्यक्ष उपस्थित राहून मला सर्वांना भेटून संवाद साधण्याची इच्छा होती परंतु काही कारणास्तव मी अशी ऑनलाईन संवाद साधत आहे असे बोलून त्या बद्दल त्यांनी खेद व्यक्त केला! नवी मुंबईतील अपोलो जीनोमिक्स या इन्स्टिट्यूट चे उद्घाटन शर्मिला टागोर यांच्या हस्ते झाले. त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. शर्मिला टागोर यांनी,''हॉलिवूड अभिनेत्री अँजेलिना जोलीच्या वैद्यकीय उपचारांची देखील माहिती देऊन तिने वेळीच घेतलेल्या उपचारांचा दाखला दिला! 

अपोलो हॉस्पिटल्सचे ग्रूप वैद्यकीय संचालक प्रा. (डॉ.) अनुपम सिबल म्हणाले, “जेनोमिक औषधांमुळे एखाद्या व्यक्तीच्या अनुवांशिक संरचनेचे मूल्यांकन करून रोगावरील उपचार आणि त्यावरील प्रतिबंध यावर लक्ष केंद्रित करता येते. अपोलो जेनोमिक औषधे परिवर्तनाची भूमिका निभावू शकतात अशा वैद्यकीय परिस्थितींमध्ये पुढील बाबींचा समावेश आहे - मुलांमध्ये वाढ होण्यास विलंब, एकापेक्षा जास्त गर्भपात, प्रगत मातृत्व वय, वंध्यत्व, कुटुंबातील अनुवांशिक रोगाचा इतिहास. अपोलो हॉस्पिटल्समधील जेनोमिक औषधोपचारात तज्ज्ञ असलेली टीम हे सुनिश्चित करेल की या आजारांचे निदान लवकरात लवकर होईल तसेच इतर जोखीम असलेल्या कुटुंबातील सदस्यांची तपासणी केली जाईल.”

मला आशा आहे की अनुवांशिक समुपदेशनाची उपलब्धता आणि अनुवांशिक विकारांबद्दल जागरूकता वाढल्याने, आपल्याला महिला आणि मुलांच्या आरोग्यावर सकारात्मक परिणाम निर्माण करता येईल. भारतातील रूग्णांच्या फायद्यासाठी नवीनतम वैद्यकीय तंत्रज्ञान आणि सर्वसमावेशक वैद्यकीय सेवा सुरु केल्याबद्दल मी अपोलो हॉस्पिटल्सचे मनापासून अभिनंदन करते.”
शर्मिला टागोर 
बॉलिवूड अभिनेत्री 

Post a Comment

Previous Post Next Post