चौदाव्या दिवा महोत्सवाला नागरिकांची ऐतिहासिक गर्दी

 


  • बाळासाहेबांची शिवसेना पुरस्कृत धर्मवीर मित्र मंडळाचा  उपक्रम 
  •   माजी उपमहापौर रमाकांत मढवी यांनी मानले  नागरिकांचे आभार 

दिवा : बाळासाहेबांची शिवसेना पुरस्कृत धर्मवीर मित्रमंडळाने आयोजित केलेल्या चौदाव्या दिवा महोत्सवाला यावर्षी नागरिकांनी तुफान गर्दी करीत इतिहास रचला आहे. कोरोना काळात असलेल्या कडक नियमांमुळे तीन वर्षे दिवा महोत्सव साजरा झाला नव्हता. पण यावेळी तो पूर्वीच्याच दिमाखात संपन्न झाला. उत्तम नियोजन, दिव्याच्या विकासासाठी हातभार लावणाऱ्या नागरिकांचा गौरव, मंडळांचा गौरव, लहान मुलांचा गौरव, शाळेय विद्यार्थांचा गौरव, महिला नारींचा गौरव तर पत्रकारांचा गौरव करुन बाळासाहेबांची शिवसेना दिवा विभागाने सर्वांची मने जिंकली आहेत.

प्रत्येक / कित्येक वर्षीच्या गर्दीचा उच्चांक मोडीत निघाला

समारोप प्रसंगी बोलताना दिवा महोत्सवाचे आयोजक माजी उपमहापौर रमाकांत मढवी म्हणाले की, गेली चौदा वर्षे दिवा महोत्सवावर आपण सर्वांनी प्रचंड प्रेम केले. प्रत्येक वर्षीच्या गर्दीचा उच्चांक तुम्ही मोडीत काढलात आणि यावर्षी तुम्ही एक ऐतिहासिक उपस्थिती दर्शवून एक इतिहास घडविला. दिवेकर बंधु भगिनींनो विकास कामांच्या माध्यमातून महाराष्ट्राचे सन्मानीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि माझे सर्व नगरसेवक आणि पदाधिकारी हे तुमची सेवा करीतच असतात, परंतु दिवेकरांना मनोरंजनाच व्यासपीठ उपलब्ध व्हावे म्हणून आपण क्रिडा, सांस्कृतिक, शैक्षणिक, उपक्रम राबवून हा दिवा महोत्सव साजरा करतो.

बाळासाहेबांची शिवसेना आताही तुमच्यासोबत पुढेही कायम राहील – रमाकांत मढवी

गेले पाच दिवस महोत्सवातील तुम्ही सगळ्यांनी प्रत्येक उपक्रमात मोठा प्रतिसाद दिलात. मी तुमचा शतशः धन्यवाद व्यक्त करतो आणि एवढेच सांगतो की, बाळासाहेबांची शिवसेना कालही तुमच्या सोबत होती...आजही तुमच्या सोबत आहे आणि यापुढेही विकासासाठी, आपत्कालीन परिस्थितीत तुमच्या सोबत राहील. याची ग्वाही देतो, असे बोलून धर्मवीर मित्रमंडळाचे आयोजक रमाकांत मढवी यांनी जाहीर आभार मानले. यावेळी सर्व नगरसेवक व बहुसंख्येने जनसमुदाय उपस्थित होता.

Post a Comment

Previous Post Next Post