मुंबई : ठाणे येथील प्रज्ञा फाऊंडेशन तर्फे भारतीय प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून अंबिका नगर येथील प्रज्ञा फाऊंडेशनच्या कार्यालयात ध्वजारोहण आणि आरोग्य शिबीर संपन्न झाले. या शिबिरात विभागातील नागरिकांनी मोठ्या उत्साहात सहभाग नोंदवला.
सकाळी संस्थेच्या कार्यालयासमोर राजपूत रेजिमेंट चे नायब सुभेदार निलेश पाटील आणि जेष्ठ महिला फुलाबाई मोरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे उदघाटन नगरसेविका एकता भोईर यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी डॉ. जयप्रकाश जैस्वाल व डॉ. लिला जैस्वाल यांनी रुग्ण तपासणी केली. आरोग्य शिबिरास अतिशय त्कृष्ट प्रतिसाद मिळाला. यावेळी वागळे इस्टेट पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक जितेंद्र राठोड भाजप नेते भूषण पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते संदीप जाधव. जेष्ठ नेते सुखदेव उबाळे,रिपाइंचे प्रल्हाद मगरे, सामाजिक कार्यकर्त्या विमल शरणागत, प्रज्ञा फाऊंडेशनचे अध्यक्ष तुळशीराम मगरे, परेश मोटे,बाबासाहेब साबळे,सुशांत साबळे,सुशील शरणागत,समाधान सावंत, शुभम वारे,आशा शरणांगत छाया बचुटे,सुमनताई शरणागत, परेगताई डोंगरे,पार्वती जाधव,शांताबाई आठवले ओमकार शरणांगत ,अजय मगरे,पप्पू गायकवाड,रवी मोरे गोरख साबळे उमेश जाधव आदी उपस्थित होते.
