डोंबिवली / शंकर जाधव : कल्याण येथील ११ वर्षीय अनंका गणेश गायकवाड ( इयत्ता 6 वी ) हिला पोहण्याची व कराटेची खूप आवड आहे.अनंका डोंबिवलीतील यश जिमखान्यात प्रशिक्षक विलास माने व रवि नवले यांच्या मार्गदर्शनाखाली पोहण्याचा सराव करते. अनंका १५ दिवस यश जिमखान्यात पोहण्याचा सराव करुन शुक्रवार २४ फेब्रुवारी रोजी पहाटे 4 वाजता अंगाला ग्रीस लावून विशाल सागरात सुर मारणार आहे. एलिफंटा जेट्टी ते गेटवे ऑफ इंडिया हे 12 किलोमीटर सागरी अंतर पोहून पार करणार आहे. अनंका गायकवाड हि कल्याण वरुन डोंबिवलीतील यश जिमखान्यात सरावासाठी येते.दररोज 4 ते 5 किलोमीटर पाण्यात सराव करते. यश जिमखाना व्यवस्थापक मॅनेजर मनोज , पतंगे मॅडम,आणि स्टाफ व प्रशिक्षक विलास माने व रवि नवले यांनी अनंकाला प्रोत्साहन दिले आहे.