जनतेच्या कामासाठी शाखाप्रमुख पद मिळाल्याचा आनंद

 

शाखाप्रमुख वैभव राणे यांचे मत 

डोंबिवली / शंकर जाधव : शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या शिकवणीनुसार ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण याप्रमाणे शिवसैनिक म्हणून काम करत आहे. नुकतीच शाखाप्रमुख पदी माझी नियुक्ती झाल्याबद्दल मी आभार मानतो. जनतेच्या कामासाठी हे पद देण्यात आले त्या पदाला न्याय देईन असे शाखाप्रमुख वैभव राणे यांनी सांगितले.

     शिवसेना डोंबिवली शहर मध्यवर्ती शाखेत नवीन पद्नियुक्ती करण्यात आली. यावेळी कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे,उपजिल्हाप्रमुख राजेश कदम,ज्येष्ठ नगरसेवक रमेश म्हात्रे,डोंबिवली शहरप्रमुख राजेश मोरे,माजी नगरसेवक शरद गंभीरराव, रवी पाटील, कार्यालयप्रमुख प्रकाश माने आदींच्या उपस्थितीत पद्नियुक्ती करण्यात आली.सामाजिक कार्याची जाण असलेला शिवसैनिक वैभव राणे यांची प्रभाग प्रभाग क्रमांक ४६ खंबाळपाडा येथील शाखाप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली.याबाबत वैभव राणे म्हणाले,मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांचे मनापासून आभार मानतो.बरीच वर्षे सामाजिक क्षेत्रात कामाची केल्याची हि पोचपावती म्हणावी लागेल. २४ तास नागरिकांच्या सेवेसाठी उपलब्ध करून नागरिकांच्या अडीअडचणी सोडविण्याच्या प्रयत्न करीन.




Post a Comment

Previous Post Next Post