दिवा मनसेकडून मराठी भाषा दिवस अनोख्या पद्धतीने साजरा

 



दिवा, / आरती मुळीक परब :  सोमवार 27 फेब्रुवारी रोजी जागतिक मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने ठामपा शाळा क्रमांक ७९/९८ दिवा, पश्चिम येथील शाळेच्या शिक्षकांचा मनसे दिवा शहर तर्फे सत्कार करण्यात आला.
दिवा पश्चिम येथील ठामपा शाळेतील विद्यार्थ्यांचा ठाणे महापालिका विज्ञान प्रदर्शनात १३५ शाळांमधून तिसरा क्रमांक आला होता. तसेच हेमा फाऊंडेशन तर्फे घेण्यात आलेल्या स्पर्धते या शाळेने राष्ट्रीय पातळीवर तिसरा क्रमांक मिळवला. या शाळेला ठाणे महापालिकेकडून मिळणाऱ्या सुविधा या अपुऱ्या असतानाही प्रतिकूल परिस्थितीतही विद्यार्थ्यांना घडवण्याचे काम करणाऱ्या शिक्षकांचा सन्मान करून खऱ्या अर्थाने मराठी भाषा दिवस साजरा करण्याचा संकल्प मनसे दिवा शहर अध्यक्ष तुषार पाटील यांनी व्यक्त केला.
त्यानुसार आज सकाळी शाळेतील शिक्षकांचा दिवा मनसे तर्फे सत्कार करण्यात आला. यावेळी सर्व शिक्षकांनी या मनसेने केलेल्या या कौतुकाचे स्वागत केले. यानिमित्ताने शाळेला भेडसावणाऱ्या विविध समस्या शिक्षकांनी तुषार पाटील यांच्याकडे मांडल्या. त्या समस्या लवकरात लवकर दूर करण्याचा प्रयत्न करू, अशी ग्वाही मनसेकडून देण्यात आली.
यावेळी दिवा मनसेचे सर्व पदाधिकारी, महिला आघाडी, विद्यार्थी सेना आणि महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.


Post a Comment

Previous Post Next Post