ठाण्यात एकूण 12278 रिक्त जागा आहेत
17 मार्च 2023 रोजी रात्री 12 पर्यंतची मुदत
ठाणे : बालकांना मोफत आणि सक्तीच्या शिक्षण अधिकार कायद्यानुसार (Right To Education) राज्यातील खाजगी शाळांमध्ये असलेल्या 25 टक्के आरटीईच्या राखीव जागांवरील प्रवेशासाठीची नोंदणी
सुरू झाली आहे. आरटीई अंतर्गत प्रवेश अर्ज करण्यासाठी 1 मार्च 2023 रोजी दुपारी 3 वाजल्यापासून सुरू झाली आहे. पालकांना 17 मार्च 2023 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत अर्ज करता येणार आहे.
यासाठीची माहिती प्राथमिक शिक्षण संचालनालयाकडून देण्यात आली असून प्रवेशासाठी आवश्यक प्रमाणपत्रांची यादी आणि कार्यवाहीची देण्यात आली आहे.
प्रवेश प्रक्रियेसाठी लॉटरीसाठी अर्ज विचारात घेतला जावा यासाठी अनेक पालक एकापेक्षा अधिक अर्ज भारतात. मात्र, यंदापासून एक हून अधिक अर्ज भरण्यावर बंदी घालण्यात आली आहे. एका विद्यार्थ्याचे एकापेक्षा अधिक अर्ज भरले असल्याचे निदर्शनास आल्यास त्याचा अर्ज लॉटरीसाठी विचारात घेतला जाणार नाही, हे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.
ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर ऑनलाईन लॉटरीची तारीख जाहीर करण्यात येणार आहे.
25 टक्के आरक्षणातंर्गत जागांसाठी एकाच टप्प्यात लॉटरी काढण्यात येणार आहे. शाळेतील जागांनुसार प्रतिक्षा यादी जाहीर करण्यात येईल. लॉटरीमध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी पुरेसा वेळ दिला जाणार असल्याचेही शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे. विद्यार्थ्यांच्या पालकांना कागदपत्रे घेऊन प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे.
https://student.maharashtra.gov.in
Tags
महाराष्ट्र