खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त क्रिकेट स्पर्धेचे आयोजन
डोंबिवली / शंकर जाधव : खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त डोंबिवली पश्चिमेकडील कुंभारखानपाडा येथे बाळासाहेबांची शिवसेना भगवा चषक २०२३ अंडरआर्म क्रिकेट सामने भरविण्यात आले होते. अंतिम सामन्यात साई इलेवन विरुद्ध मार्ववेल टर्फ याच्यात चुरशीची लढत झाली. यात साई इलेवनने बाजी मारत बाळासाहेबांची शिवसेना भगवा चषक २०२३चे मानकरी ठरले. हरीश्चंद ( बंडू ) पाटील आणि संदेश पाटील यांच्या यांनी विजेत्या संघाला ट्रॉफी,प्रमाणपत्र दिले.
बाळासाहेबांची शिवसेना भगवा चषक २०२३चे अंडरआर्म क्रिकेट सामन्यात साई इलेव्हन, मार्ववेल टर्फ, अष्टविनायक, अद्वैत रोकर्स, एसविवीसीसी, शिवराज, एमबी ग्रुप, साई कृपा या संघाने भाग घेतला. तर शिवराज युमन्स,साई गजानन आर्केड युमन्स आणि एससिसी युमन्स या महिला संघानेही भाग घेतला होता. स्पर्धेत संतोष पेंढणेकर यांनी पंच म्हणून काम पहिले. या स्पर्धेत निखील घाणेकर याला उत्कृष्ट खेळाडू म्हणून याला ट्रॉफी आणि सायकल, उत्कृष्ट फलंदाज मंदार भोईर याला ट्रॉफी आणि बॅट, उत्कृष्ट गोलंदाज निखील अवेरे याला ट्रॉफी आणि बूट,उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ओम म्हात्रे याला ट्रॉफी आणि बूट, १५ वर्षाखालील रुचित भंडारी याला उत्कृष्ट खेळाडू म्हणून ट्रॉफी, उत्कृष्ट फलंदाज हर्षद याला ट्रॉफी आणि उत्कृष्ट गोलंदाज अमेय यालाहि ट्रॉफी देण्यात आली. महिला संघाच्या अंडरआर्म क्रिकेट सामन्यात उत्कृष्ट खेळाडू म्हणूनसीमा सावंत हिला ट्रॉफी, उत्कृष्ट फलंदाज अक्षता महाडिक हिला ट्रॉफी तर मयुरी चव्हाण हिला उत्कृष्ट फलंदाज म्हणून ट्रॉफी देण्यात आली.