तुर्कीत भूकंपाचे तांडव


तुर्कीसह लेबनॉन, सीरिया, सायप्रस, इस्रायल या शेजारी देशांमध्येही भूकंपाचे धक्के 

 तुर्की:  तुर्कीमध्ये २४ तासांत भूकंपाचे तीन तीव्र धक्के बसले आहेत. सोमवारी सीरियाच्या सीमेनजीकच्या भागात पहाटे सव्वाचारच्या सुमारास शक्तिशाली भूकंप झाला. त्यानंतर पुन्हा आता भूकंपाचा झटका तुर्कीत जाणवला आहे. नव्या भूकंपाची तीव्रता 7.5 इतकी आहे. यात आता पर्यन्त तीन हजाराहून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे.

तुर्की आणि सिरियामध्ये सोमवारी आलेल्या भूकंपामुळे मृत्यूचे तांडव पाहायला मिळाले. तुर्कीमध्ये सोमवारी पहाटेपासून तब्बल ७.९ तिव्रतेचे तीन मोठे भूकंपाचे धक्के बसले. या दुर्घटनेत आता पर्यन्त तीन हजारहून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे, तर १६ हजारांहून अधिक नागरिक जखमी झाले आहेत. सर्वाधिक मृत्यू हे तुर्कीमध्ये झाले. या भूकंपामुळे अनेक गगनचुंबी इमारती या कोसळल्या. तर अनेक घरांचे मोठे नुकसान झाले. ढिगाऱ्याखाली अनेक नागरिक अडकले असल्याची स्थिती आहे. जगभरातील अनेक राष्ट्रांनी तुर्कीला मदत करण्यासाठी सरसावले आहेत. एकाच दिवसांत तीन मोठे भूकंप आल्याने सर्वाधिक नुकसान झाले आहे. तुर्कीने सात दिवसांचा दुखवटा जाहीर केला आहे.

भूकंपाची तीव्रता लक्षात घेऊन अमेरिकेने तुर्कीला मदतीची घोषणा केली आहे. "तुर्कीत अतिशय विनाशकारी असा भूकंप आला. अनेक नागरिकांचा यात मृत्यू झाला आहे. आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहोत. तुर्की प्रशासनाच्या आम्ही संपर्कात आहोत. आम्हाला कोणत्या पद्धतीने आणि वेगवान पातळीवर कशी मदत पोहोचवता येईल याचं नियोजन सुरु आहे", असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी सांगितले.

Post a Comment

Previous Post Next Post