अब हमारी पर्मनंट बूकिंग हो गयी है !

 


 सिद्धार्थ - कियाराची फोटोबाजी 

जैसलमेरमधील हॉटेल सूर्यगढमध्ये अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि कियारा अडवाणी यांनी लग्नगाठ बांधल्यानंतर दोघांनी लग्नाचे पहिले फोटो इंस्टाग्राम हँडलवर शेअर केले आहेत. लग्नाचे खास फोटो शेअर करताना जोडप्याने लिहिले- 'आता आमचे परमनंट बुकिंग झाले आहे. तुमच्या सर्वांच्या प्रेमाची आणि आशीर्वादाची आम्हाला गरज आहे. शेरशाह फेम कपलला रिअल लाईफ कपल म्हणून पाहण्याची चाहत्यांना खूप दिवसांपासून इच्छा होती, अखेर तो दिवस उजाडला असे म्हटले आहे. 

कियारा-सिद्धार्थने कधीही चाहत्यांसमोर आपले प्रेम व्यक्त केले नाही. दोघांकडूनही लग्नाची घोषणा करण्यात आली नव्हती. शेरशाहच्या शूटिंगपासून सुरू झालेली प्रेमकहाणी दोघांनी बराच काळ लपवून ठेवली.
मात्र, 2020 मध्ये जेव्हा ते आफ्रिकेत नवीन वर्ष साजरे करण्यासाठी गेले तेव्हा त्यांच्या नात्याची चर्चा रंगू लागली. यानंतर, 2021 मध्ये कियाराने सिद्धार्थच्या आई-वडिलांना तिच्या घरी जेवणासाठी आमंत्रित केले होते. सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि कियारा अडवाणी यांच्या लग्नाची कोणालाही खबर नसल्याने दोघांच्या ही चाहत्यांना धक्का बसला आहे.  त्यांच्या या अचानक सरप्राईझ नंतर सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे त्याच्यबरोबर काही नेटकरी सोशल मीडियावर मीम्स शेअर करत आहेत.


Post a Comment

Previous Post Next Post