सीसीआयच्या मोठ्या विजयात बैस, आनंद चमकले

 


निरलॉन-आरएफएस तल्यारखान स्मृती आमंत्रित क्रिकेट स्पर्धा

मुंबई : आनंद बैस (नाबाद 75) आणि आकाश आनंद यांच्या (नाबाद 49) नाबाद अर्धशतकांच्या जोरावर गतविजेत्या क्रिकेट क्लब ऑफ इंडियाने बॉम्बे जिमखाना लि. आयोजित निरलॉन-आर.एफ.एस. तल्यारखान स्मृती आमंत्रण क्रिकेट स्पर्धेत (सीसीआय) सलामीच्या लढतीत निरलॉन एससीवर (स्पॉन्सर इलेव्हन) नउ विकेट राखून आरामात विजय मिळवला.

सीसीआयने प्रथम क्षेत्ररक्षण करताना 19.4 षटकांत निरलॉनला 138 धावांमध्ये रोखले. त्यात सौरभ सिंगने 44 आणि देव पटेल यांनी 39 धावा करताना संघाला शंभरीपार नेले. सीसीआयकडून प्रथमेश डाके (3/21), परीक्षित वळसंगकर (2/18) आणि बद्रे आलम (2/23) यांनी अचूक मारा केला. प्रत्युत्तरादाखल, बैस आणि आनंद यांनी फटकेबाजी करत अवघ्या 11 षटकांत एका विकेटच्या बदल्यात 139 धावांचे आव्हान पार केले. बैसने केवळ 32 चेंडूंमध्ये पाउणशे धावांची नाबाद खेळी साकारली. त्यात 6 चौकार आणि तितक्याच षटकारांचा समावेश आहे. आनंदने त्याच्या 31 चेंडूंतील 49 धावांच्या खेळीत सात चौकार आणि एक षटकार मारला.

Post a Comment

Previous Post Next Post