आकांक्षा व समृद्धी यांची रुपेरी कामगिरी
भोपाळ / विशेष प्रतिनिधी : श्रद्धा चोपडे या आंतरराष्ट्रीय खेळाडूने मिळवलेल्या सुवर्णपदकासह आज ज्युदोमध्ये महाराष्ट्राने पदकांची हॅट्ट्रिक केली. आकांक्षा शिंदे व समृद्धी पाटील यांनी रौप्य पदक जिंकले.
मुलींच्या ४८ किलो गटात श्रद्धा व आकांक्षा या दोन्ही महाराष्ट्राच्या खेळाडूंमध्ये सुवर्णपदकासाठी लढत झाली. त्यामध्ये श्रद्धा हिने आंतरराष्ट्रीय स्पर्धांच्या अनुभवाचा फायदा घेत विजयश्री संपादन केली. औरंगाबादची खेळाडू असलेली श्रद्धा ही सध्या भोपाळ येथील आंतरराष्ट्रीय अकादमीतच सराव करीत आहे. आकांक्षा ही नाशिक येथील खेळाडू आहे. ५७ किलो गटात कोल्हापूरच्या समृद्धी पाटील हिला उत्तराखंडच्या स्नेहा कुमारी हिच्याकडून पराभव पत्करावा लागला.