मुंबई: बेस्ट उपक्रमाने ‘बेस्ट चलो ॲप ’ आणि ‘बेस्ट चलो स्मार्टकार्ड’च्या माध्यमातून डिजिटल पध्दतीने प्रवासभाडे प्रदान करण्याची सुविधा प्रवाशांना उपलब्ध करून दिली आहे.
या सुविधेचा लाभ घेण्याकरीता प्रवाशाना त्यांच्या मोबाईलच्या माध्यमातून ‘बेस्ट चलो ॲप किंवा ‘बेस्ट चलो स्मार्टकार्ड’द्वारे प्रवासभाडे अदा करावयाचे आहे. डिजिटल पध्दतीने प्रवासभाडे आकारणीमुळे प्रवाशांना सुट्टया पैशांची अडचण निर्माण होणार नाही.
या डिजिटल पध्दतीचा प्रसार आणि वापर मोठया प्रमाणावर होण्याकरीता उपक्रमाच्यावतीने उपक्रमाच्या बसगाडयांमधून प्रवास करणा-या प्रवाशांकरीता काही अतिरिक्त सुविधा दिनांक १.०३.२०२३ पासून देण्यात येत आहेत. याअंतर्गत ‘बेस्ट चलो ॲप’ अथवा ‘बेस्ट चलो स्मार्टकार्ड’चा अवलंब करणाऱ्या प्रवाशांना बेस्ट उपक्रमाच्या बसगाडयांमध्ये प्राधान्याने प्रवेश देण्यात येईल. विशेषतः सुरुवातीच्या बसथांब्यांवर अशा प्रवाशांना सर्वप्रथम प्रवेशाची सुविधा राहील. On Line Re-charge च्या सुविधेबरोबरच बसगाडीतील बसवाहकाकडून देखील Re-charge ची सुविधा उपलब्ध करण्यात आलेली आहे.
बेस्ट उपक्रमाच्या बसगाडयांमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी बेस्ट उपक्रमाने उपलब्ध केलेल्या ‘बेस्ट चलो ॲप ’ किंवा ‘बेस्ट चलो स्मार्टकार्ड’ या डिजिटल सुविधांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे बेस्ट उपक्रमातर्फे आवाहन करण्यात येत आहे.