संभाजीनगर, धाराशीवः औरंगाबाद-उस्मानाबादच्या नामांतरास केंद्र सरकारची मंजुरी



 मुंबई: महाराष्ट्रातील औरंगाबादचे नाव छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचे नाव आता धाराशिव होणार आहे. या दोन्ही जिल्ह्यांच्या नामांतराबाबत राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. यासंदर्भातील केंद्र सरकारच्या शासन-निर्णयाची प्रत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतेच ट्विट करून सर्वांना याबाबत सर्वांना माहिती दिली.

मुख्यमंत्री एकनाथजींच्या नेतृत्वाखालील सरकारने औरंगाबादचे नाव छत्रपती संभाजीनगर करण्यास मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. औरंगाबादचे नामकरण करण्याची शिफारस १६ जुलै २०२२ रोजी मंत्रिमंडळात करण्यात आली होती. या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

 देवेंद्र फडणवीस ट्विटमध्ये म्हणाले, "औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर', उस्मानाबादचे 'धाराशिव', राज्य सरकारच्या निर्णयाला केंद्र सरकारची मंजुरी."पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री अमित शाह यांचे कोटी-कोटी आभार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने करून दाखवले. "

औरंगाबाद आणि उस्मानाबाद शहरांच्या नामांतर कण्याची मागणी महाराष्ट्रात गेली 20 वर्षापासून सुरु होती. याआधी ठाकरे सरकारच्या शेवटच्या मंत्रिमंडळ बैठकीत औरंगाबाद शहराला संभाजीनगर आणि उस्मानाबादला धाराशिव असे नाव देण्यात आले. मात्र, शिंदे सरकार आल्यानंतर या निर्णयाला स्थगिती देऊन पुन्हा मंत्रिमंडळात प्रस्ताव आणून दोन्ही शहरांची नावे बदलण्यात आली. त्यानंतर याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली होती.



Post a Comment

Previous Post Next Post