ठाणे : सलून ब्युटी पार्लर असोसिएशन महाराष्ट्र, मुंबई ठाणे अंतर्गत ठाण्यातील सलून दुकानदार कै. मनीष शर्मा यांच्या आत्महत्येला जबाबदार आरोपींना लवकरात लवकर पकडण्यात यावे. तसेच त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत मिळावी. यासाठी सलून ब्युटी पार्लर असोसिएशनतर्फे ठाणे DCP तसेच ठाणे जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. त्याप्रसंगी सलून ब्युटी पार्लर असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष दत्तात्रय चव्हाण महाराष्ट्र अध्यक्ष दिपक यादव , प्रभारी उदय टक्के, मुंबई अध्यक्ष तुषार चव्हाण, ठाणे जिल्हा अध्यक्ष. रमेश चव्हाण. ठाणे सेक्रेटरी मंदार राऊत, शैलेश कदम , कार्याध्यक्ष निलेश रणदिवे, सरचिटणीस कीसनराव कोहाळे, सेक्रेटरी सचिन टक्के, उपाध्यक्ष संदीप बद्रिके, अनिल पवार, संदीप जाधव, सतीश पवार व सर्व मान्यवर उपस्थित होते.