मल्लखांब स्पर्धेत महाराष्ट्र संघ राैप्यपदकाचा मानकरी













उज्जैन : गत उपविजेत्या महाराष्ट्र मल्लखांब संघाने पाचव्या सत्रातील खेलाे इंडिया युथ गेम्समध्ये मंगळवारी राैप्यपदकाचा बहुमान पटकावला. महाराष्ट्र संघ सांघिक गटामध्ये रौप्य पदकाचा मानकरी ठरला आहे. राष्ट्रीय खेळाडू शार्दूल जाेशी, दर्शन, रणवीर माेहिते, वेदांत शिंदे, ऋषभ, मृगांक पाथरे, श्रेया सपकाळ, समीक्षा सुरडकर, प्रणाली माेरे, तनुश्री जाधव आणि आकांक्षा बरगेने सर्वाेत्तम करसतीच्या बळावर महाराष्ट्राला पदक मिळवून दिले. महाराष्ट्र संघाने सांघिकच्या फायनलमध्ये ५०५.०७ गुणांसह राैप्यपदक आपल्या नावे केले. यजमान मध्य प्रदेश संघाने ५०७.२० गुणांसह सुवर्णपदक जिंकले. 
मुख्य प्रशिक्षक रवी कुमठेकर यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र संघाने घवघवीत यश संपादन केले. आता महाराष्ट्राच्या ऋषभ, शार्दूल, समिक्षा आणि तनुश्री यांना वैयक्तिक गटात सुवर्णपदकाची संधी आहे.

Post a Comment

Previous Post Next Post