वंदे भारत एक्सप्रेसचे भाजपकडून दिवा स्थानकात जल्लोषात स्वागत

 


दिवा / आरती  परब मुळीक : पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वंदे भारत एक्सप्रेसचे उद्घाटन करण्यात आले. मुंबई - साईनगर शिर्डी व मुंबई - सोलापूर या दोन रेल्वे आज मुंबई, महाराष्ट्र वासीयांच्या सेवेत रेल्वेने समर्पित केल्या आहेत. विशेष बाब म्हणजे या दोन्ही रेल्वे प्रथमच एकाच राज्यासाठी सुरू झाल्या आहेत. आतापर्यंत सुरू झालेल्या वंदे एक्सप्रेस या एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जाणाऱ्या आहेत. हा उत्सव संपूर्ण महाराष्ट्र साजरा करत असताना दिवा भाजपने सुद्धा आज या दोन्ही रेल्वेचे स्वागत अत्यंत जल्लोषात दिवा रेल्वे स्थानकावर केले. 
यावेळी उत्स्फूर्तपणे शेकडो कार्यकर्ते, नागरिक उपस्थित होते. संपूर्ण रेल्वे स्थानक परिसर यावेळी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी व भाजपाच्या जयघोषाने दुमदुमला होता. यावेळी वंदे भारतच्या स्वागतासाठी कार्यकर्त्यांनी नियमाधीन राहून स्वयंस्फूर्तीने सुगंधी फुले फलाटावर पसरवली होती. यावेळी दिवा भाजप कार्यकारिणी सदस्य विजय भोईर, मंडळ अध्यक्ष रोहिदास मुंडे, भाजप युवा मोर्चा अध्यक्ष सचिन भोईर, सरचिटणीस समीर चव्हाण, अवधराज राजभर, निलेश भोईर, गौरव पाटील, आकाश भोईर, आतिश साळुंखे, प्रणव भोईर, साईनाथ भोईर, जीलाजित तिवारी, अमरनाथ गुप्ता, महेंद्र विश्वकर्मा, हरिहर राजभर, कल्पेश सारस्वत, अमन गुप्ता, उत्तर भारतीय महिला मोर्चा अध्यक्ष सुनीता प्रजापती, चंद्रकला सिंह, अनिता यादव, राघिणी गौर, रंभा राजभर अनिता प्रजापती, निषा सिंह, नीलम मिश्रा, संजना गावडे, शीतल लाड व इतर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post