डोंबिवली / शंकर जाधव : डोंबिवली पश्चिमेकडील मोठा गांव येथील खाडीकिनारी असणाऱ्या निसर्गरम्य वातावरणात असणाऱ्या स्वामीनारायण गृहासंकुलात गौतम सिंघानिया ग्लोबल स्कूल सुरू होणार आहे. भारतातील आघाडीच्या पाच टॉप शाळांमध्ये सिंघानिया स्कूल येते. डोंबिवलीत सिंघानिया स्कूल जून मध्ये सुरू होणार असल्याची माहिती संचालिका रेवती श्रीनिवासन यांनी दिली.
मोठा गांव डोंबिवली पश्चिम येथील स्वामीनारायण गृहसंकुलात याबाबतची पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी संचालिका रेवती श्रीनिवासन, स्थायी समितीचे माजी सभापती दीपेश म्हात्रे, शाळेचे पदाधिकारी निशांत कौशिक, सचिन पटेल आदी उपस्थित होते.यावेळी सिंघानिया शाळेच्या संचालिका रेवती श्रीनिवासन यांनी सांगितले की, डोंबिवलीत मोठा गाव ठाकूर येथील शाळेची प्रशस्त इमारत, मोठी चांगली मोकळी जागा आणि नैसर्गिक वातावरण असणारं हे स्वामीनारायण संकुल आहे. येत्या जून महिन्यापासून शाळा सुरू होणार आहे. आम्हाला आनंद वाटते की डोंबिवलीत स्वामीनारायण संकुलात आमची पहिली सिंघानिया शाळा सुरू करीत आहोत. ठाण्यानंतर प्रथमच ही मजल आम्ही मारत आहोत. ही शाळा गौतम सिंघानिया नावाने असेल. १ जून, 2023 ला शाळा सुरू होईल. आम्ही डोंबिवलीकरांना निमंत्रित करतो की आमच्या शाळेत शाळेला भेट द्या. येत्या दोन दिवसात याचा शुभारंभ होणार आहे. नर्सरी पासून केजी, सीनियर ज्युनिअर, पहिली आणि दुसरी असे पाच वर्ग सुरू होतील.
पुढील 2024 मध्ये तिसरी चा वर्ग सुरू होईल. इंग्रजी माध्यमातून आयसीआयसीआय च्या माध्यमातुन शिक्षण देणारी अनुभवी शिक्षक आहेत. शाळेत सर्वांना समान शिक्षण मिळेल. मुलांना नक्कीच आदरणीय, आवडणारी शाळा होईल. डोंबिवलीतच शाळा काढण्यावर त्यांनी सांगितले, डोंबिवलीत शिक्षणाला महत्त्व दिल जात. ज्या शहरात शिक्षणाला महत्त्व देणारी माणसं असतात तिथे शाळा सुरू करण्यात वेगळा आनंद असतो. यासाठीच डोंबिवली शहराची निवड करण्यात आली.
शाळेत सुमारे 2000 विद्यार्थी असतील. शाळा डोनेशन घेत नाही. शाळेची फी अन्य शाळांच्या तुलनेत पालकांना परवडणारी असेल. जागतिक पातळीवर यशस्वी होणारे विद्यार्थी घडवले जातात, शाळेत आनंददायी शिक्षण संकल्पना राबवली जाते. गार्डन खेळाचे मैदान या सगळ्या गोष्टी डोंबिवलीत होणाऱ्या शाळेत उपलब्ध असतील. तर दीपेश म्हात्रे म्हणाले, डोंबिवलीत ग्लोबल स्कूल सुरू व्हावी अशी अपेक्षा होती. काही ग्लोबल स्कूल आहेत मात्र सिंघानिया यांचे नाव फार वरच्या वर्गात आहे. सिंघानिया शाळेमुळे डोंबिवलीचा नावलौकिक अजून वाढेल. ही शाळा होत आहे ही आनंदाची गोष्ट आहे. दर्जेदार शिक्षण यामधून डोंबिवलीकरांना देऊ शकतो. भारतातील पाच टॉप शाळांमधील सिंघानिया स्कूल आहे त्यामुळे चांगले शिक्षण आणि इतर सोयी डोंबिवलीकरांना मिळणार आहेत.