आई आणि मी

 


2 मार्च आईंचा वाढदिवस. आजच्या दिवशी आईंना हा माझा मानाचा मुजरा आणि सलाम तुमच्या सहकार्याला आई. मला आधार मिळावा म्हणून आईने स्वतःच्या इच्छा मागे ठेवल्या. अशी माझ्या आत्मविश्वासू इच्छापूर्ती आई.प्रत्येक जन्मी हीच आई मिळो हीच माझी देवाला प्रार्थना आहे. म्हणून माझे एकच आग्रह आहे सगळ्या सासुना, तुम्ही तुमच्या सुनांची आई व्हा नक्कीच घरात यश, बरकत आणि बहार येईल घराला.  

आई म्हणजे जन्म देणारी. पण माझ्यासाठी आई म्हणजे माझा आत्मविश्वास वाढवणारी आणि माझ्या इच्छा जपणारी आई - आ आत्मविश्वास, ई - इच्छा. आईनं मला जन्म नाही दिला, पण त्याहून अधिक दिले. मी ज्या आई बददल बोलते ते आहेत माझ्या सासूबाई. नवीन नवरी म्हणून घरात प्रवेश केल्यापासून, मी आहे तुझ्या पाठीशी हे बोल नेहमी ऐकायला मिळाले. पण त्याचा अनुभव छोट्या छोट्या गोष्टीतून झाले. मी भाजी केली पण मीठ जास्त झाले, काही हरकत नाही आज जेवणात सगळ्यांना थोडे दही वाढ आईचा दिलासा. आज थोडे वरण तिखट झाले आहे, आई हरकत नाही गोड आंबट वरण खाऊया, घाल त्यात गुड आणि कोकम. असे करता करता काही वर्षे सहज गेले माझे आई कडून घर सांभाळायला. आई अमच्या सर्वांचा आधार स्तंभ आहेत. आईंना नेहमी वाटत होते त्यांच्या मुलाने मागे कधीच राहू नये मग ती सून का असो, तिने काहीतरी करावे. आईंचे हे वाक्य घरातील कामे तर होत राहतील पण त्यात अडकायचे नाही हे आज पण मला मजबूत बनवते. जो पर्यंत मी आहे तो पर्यंत माझा असल्याचा फायदा करून घ्या.तुमचे आयुष्य जगा. जसे माझ्या मुलाचे जन्म झाले आईच त्याची आई झाल्या. आई स्वतः इतक्या बळकट आहेत की नेहमी मला आधार , धीर देत राहिल्या. आज च्या जीवनात दोघे नवरा बायको ने नौकरी करणे खूप गरजेचे आहे. पण त्यात सहा महिन्याचे मुल घरी ठेवून जाणे माझे मन काही परवांगी देत नव्हता,काय करावे नौकरी करावी की घरी राहून मुलाचा सांभाळ करावा ह्या द्वंद्व युद्धात होता, त्यात जणू देवच मला सांगतात तू तुझी नौकरी कर मी आहे आयुष्य म्हणजे मुलाला सांभाळायला. मी एक शिक्षिका आहे. शाळेत नोकरीला रुजू झाले आणि मुलांना शिकवायला लागले. किती महत्वाचे आहे आपल्याला ह्या जगात आपल्या पायावर उभे राहणे हे आईने आत्मविश्वास देऊन सांगितले. घरात कामात चुका झाल्या तर आहे मी सांभाळायला पण जर का बाहेर चूका झाल्या तर मात्र खैर नाही म्हणून जपून आणि मन लावून काम करा आईने कान मंत्र दिले. मग काम करायचे म्हणून कराल तर त्यात मोठे आणि नवल काय? जर तुम्हाला वेळ आणि संधी मिळते तर काही वेगळे करून दाखवा आईचे हे प्रोत्साहन असायचे. किती बळ होते त्यांचा शब्दात, हे जेव्हा माझ्या पाठीवर लोकांची थाप मिळू लागली तेव्हा मला समजू लागले. 

   माझ्या इच्छा सुद्धा आईने जपल्या. सून असली म्हणून काय झाले तू जीन्स घाल, तुला वाटते आज सिनेमा बघायचे आहे जा बघ, आज बाहेर जेवायचे आहे जा नक्की, मी आहे घर आणि आयुषला सांभाळायला. असे करत करत वर्षे नि वर्षे निघून गेले. आई आहेत म्हणून कधी आजारी पडले तर बेड वर जेवायला ताट मिळते. आई आहेत म्हणून बाहेर तासनं तास राहून माझे काम करता येते, घराची कसली ही चिंता न करता. आई आहेत म्हणून मी स्वतःला घडवू शकले बाहेर शिक्षण क्षेत्रात नाव कमावले. डोळ्यात अश्रू येतात पदर घेऊन उभे राहिले, डोळे पुसून काढले. हसत खेळत रहावे म्हणून हास्याची जत्रा भरत होत्या. माझे हे सगळे श्रेय मी आईंना देते. त्यांच्या मुलेच मी मला स्वतःला शोधू शकले घडू शकले. 

वाढदिवस विशेष 

डॉ साक्षी आशिष भोईटे


Post a Comment

Previous Post Next Post