डोंबिवलीत शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी

 

डोंबिवली / शंकर जाधव :  हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीनुसार शिवजयंती डोंबिवली शहरात साजरी करण्यात आली. शिवसेना, मनसे तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आदी शिवसैनिकांनी मोठय़ा उत्साहात आणि जल्लोषपूर्ण वातावरणात  साजरी केली.

कोपररोड येथील माजी नगरसेवक संजय पावशे आणि अपर्णा संजय पावशे यांच्या माध्यमातून शिवजयंती निमित्त सत्यनारायण महापूजा आणि साहसी खेळांचे प्रात्यक्षिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. सातारा येथील तरुण-तरुणींनी लाठी-काठी, तलवारबाजी, दानपट्टा आदी खेळात सहभाग घेतला.पश्चिम रेल्वे स्थानक शेजारी चौकात मनसे माध्यमातून शिवजयंती उत्सव साजरा करण्यात आला होता. प्रेमनाथ पाटील, संकेत तांबे, श्रीकांत वारंगे आणि  पदाधिकारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची स्थापना केली होती. यावेळी मनसैनिकांनी पुष्पहार अर्पण करून छत्रपती शिवाजी महाराज की जय च्या घोषणा देत परिसर दणाणून सोडला होता. शहरात चौकाचौकात शिवजयंती उत्सव साजरा करण्यात आला होता.डोंबिवली शिवसेना मध्यवर्ती शाखेच्या माध्यमातून सकाळी डोंबिवली शहरप्रमुख राजेश मोरे, पदाधिकारी व सैनिकांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला दरम्यान शिवाजी महाराज की जय अशा घोषणा देण्यात असल्या. मानपाडा रोडवरील मध्यवर्ती शाखेच्या समोरील भागात महाराजांच्या इतिहासकालीन गौरव गोष्टींचे चलचित्र देखावे लक्ष वेधून घेत आहेत. विशेष म्हणजे "३५० वर्षानंतर पुन्हा तोच योग" या मथळ्याखाली "मला विश्वास आहे... आमचे प्रखर हिंदुत्वाचे विचार आणि भूमिका एकनाथा...

तूच पुढे नेऊ शकतोस... म्हणूनच श्रीरामाचा धनुष्यवाण तुझ्या हाती सुपूर्द करणे हा दैवी संकेतच आहे... यशस्वी भवे....!! असे चित्र रेखाटण्यात आले असून नागरिक याचे वाचन करीत आहेत.

   शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख सदानंद थरवळ यांनी शहरातील शिवजयंती कार्यक्रमाला भेटी दिल्या. माजी नगरसेविका संगीता मुकेश पाटील तसेच समाजसेवक मुकेश रामदास पाटील यांच्या शिवजयंती उत्सवाला थरवळ यांनी भेट दिली. यावेळी शाखाप्रमुख निलेश सावंत यांच्यासह पदाधिकारी व शिवसैनिक मोठया संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post