डोंबिबली / शंकर जाधव : दरवर्षी प्रमाणे याही वर्षी जय हनुमान युवा प्रतिष्ठान सामाजिक संस्था भोपर यांच्या वतीने भोपर गावात होळीसाठी जे नैवद्य येते त्यामध्ये पुरणपोळी, पापडी, करंजी, पुरी इ. फराळ हे जमा करून वीटभट्टीवर कामे करणारे व बांधकाम ठिकाणी कामे करणारे वेठबिगारी यानां त्याचं वाटप करून त्यांच्या सोबत होळी, रंगपंचमी साजरी केली.
यामध्ये मंडळाचे सचिव अँड ब्रम्हा माळी, अध्यक्ष रमेश पाटील, उपाध्यक्ष मधुकर माळी, सहसचिव नितीन माळी, सुभाष माळी, संतोष माळी, नवनाथ गायकर, कमलाकर पाटील, सचिन पाटील, भारत पाटील, उमेश माळी, शिरीष माळी, पंकज माळी, रजत पाटील, विराज माळी, महेंद्र माळी, शक्ती माळी, जोगिंदर माळी, राहुल ठाकूर इत्यादी उपस्थित होते.