दिवा : जागतिक महिला दिनाच्या उत्तर संधेला दिव्यातील शिंदे गटाच्या शिवसेनेकडून आज दिव्यात महिला दिनानिमित्त महिला सन्मान रॅली काढण्यात आली.
आईच्या वात्सल्याला प्रणाम, बहिणीच्या प्रेमाला प्रणाम, मैत्रिणीच्या विश्वासाला प्रणाम, पत्नीच्या खंबीर पाठिंब्याला प्रणाम, माझ्या आयुष्यातील प्रत्येक स्त्री शक्तीला प्रणाम, महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा अशा शुभेच्छा प्रत्येक जण आपल्या नात्यातील प्रत्येक महिलेला जागतिक महिला दिनी देत असतो. अशाच शुभेच्छा दिव्यातील शिंदे गटाच्या शिवसेनेने ही दिव्यातील सर्व महिलांना दिल्या. प्रथम प्रत्येक महिलेला मानाचा फेटा घालण्यात आला. त्यानंतर त्यांना जागतिक महिला दिनाच्या भरभरुन शुभेच्छा देण्यात येऊन आपण आहात म्हणून या घराला, या समाजाला, या देशाला अर्थ आहे, असे कौतुक ही महिलांचे त्यावेळी केले गेले.
त्यावेळी माजी नगरसेविका, माजी नगरसेवक, दिवा शहर प्रमुख, विभाग प्रमुख, उपविभाग प्रमुख यासर्वांकडून महिलांना शुभेच्छा मिळाल्या. त्यानंतर महिलांच्या सन्मानार्थ भव्य दिव्य महिला सन्मान रॅली दिव्यात काढण्यात आली. ही रॅली दिवा टर्निंग ते दिवा दातिवली विठ्ठल मंदिर पर्यंत होती. या रॅलीमध्ये महिलांनी बॅंजोच्या गाण्यावर ठेका धरला तर काही मुलींनी लेझीम खेळत महिला दिन साजरा केला. गेल्या वर्षीप्रमाणे या वर्षीशी महिला सन्मान रॅलीला महिलांचा उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला. शिंदे गटाच्या शिवसेनेकडून महिला दिना निमित्त सन्मानार्थ रॅली काढून, महिलांचा गौरव केला गेला. महीला दिन सन्मानार्थ भव्य दिव्य रॅली काढून, महीलांचा गौरव करण्यात आला.