मनसेच्यावतीने शाळा- महाविद्यालयात मोफत सैनिटरी नैपकिन मशीनचे वाटप

 


डोंबिवली /  शंकर जाधव :  जागतिक महिला दिन व मनसे वर्धापनदिन याचे औचित्य साधून मनसे नेते तथा कल्याण ग्रामीण आमदार प्रमोद ( राजू ) पाटील व कल्याण ग्रामीण मनसे अध्यक्ष विनोद पाटील, शहर अध्यक्षा मंदा पाटील यांच्या सहकार्याने व जिल्हा अध्यक्ष प्रकाश भोईर, शहर अध्यक्ष मनोज घरत यांच्या मार्गदर्शनाने व विद्यार्थी सेना शहर अध्यक्ष मिलिंद म्हात्रे यांच्या पुढाकाराने कल्याण ग्रामीण व डोंबिवली मधील शाळा- महाविद्यालय मध्ये पहिल्या टप्प्यात नऊ शाळेत मोफत सैनिटरी नैपकिन मशीनचे वाटप करण्यात आले ग्रीन इंग्लिश स्कूल (एमआयडिसी) कोटकर शाळा,भिसे विद्यालय, स्वामी विवेकानंद शाळा, दत्तनगर-तुकाराम नगर,डीएनसी शाळा या शाळेत मशीनचे वाटप करण्यात आले.

यावेळी महिला सेना शहर अध्यक्षा मंदा पाटील, विद्यार्थी सेना शहर अध्यक्ष मिलिंद म्हात्रे, कल्याण लोकसभा जिल्हा सचिव प्रितेश पाटील, उपजिल्हा अध्यक्ष दिपतेश नाईक, संघटक सुमेधा थत्ते, शर्मिला, उपशहर अध्यक्ष सुहास काळे, प्राजक्ता देशपांडे, विभाग अध्यक्ष संजय चव्हाण, अंजना भोईर, संगीता खोत, कुणाल मोर्ये, विनय कुंभार, सचिन माने, अनिल वालेकर, मयूरेश उतेकर, निखिल कदम व महिला सेना, विद्यार्थी सेना सहकारी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post