महिला दिनानिमित्त दिव्यात रेल्वे महिला चालकाचे स्वागत




दिवा :  जागतिक महिलादिना निमित्त ठिकठिकाणी महिलांचा सत्कार होत असतो. तसाच सत्कार दिवा स्टेशन परिसरात झाला. आज महिलादिना निमित्त महिला स्पेशल गाडी चालवणाऱ्या मुमताज काझी या रेल्वे महिला चालकाचे जंगी स्वागत दिव्यात झाले. हे स्वागत भारतीय मराठा संघ, उपाध्यक्षा आणि आम्ही दिवा रेल्वे प्रवासी संघटनेच्या अध्यक्षा श्रावणी गावडे यांनी केले. दिव्यात रेल्वे महिला चालकाचे स्वागत करण्याचे हे सातवे वर्ष असून त्यावेळी तेथे उपस्थित असणाऱ्या नागरिकांनीही महिलांना महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या. त्यावेळी सरिता अरगडे, आर पी एफ (RPF) पोलीस यांचा ही सत्कार करण्यात आला. त्यानंतर दिवा स्टेशनवरील पोलीस दलातील महिला, सफाई कर्मचारी, रेल्वे फाटका वरील महिला कर्मचारी याना ही गुलाबाचे फुल देऊन सन्मान करुन त्यांच्या कामासाठी धन्यवाद दिले. 

Post a Comment

Previous Post Next Post