फेरीवाल्यांची रुग्णवाहिका चालकास मारहाण

रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल,दोघे ताब्यात 

      डोंबिवली / शंकर जाधव : डोंबिवली पूर्वेकडील मधूबन- पूजा गल्लीत गुरुवारी सकाळच्या सुमारास रुग्णवाहिकेला पुढे जाण्यास अडचण येत होती. येथील फेरीवाल्याला रुग्णवाहिका चालकाने माल बाजूला काढण्यास सांगितले असता फेरीवाल्याने हुज्जत घातली.या घटना पाहताना नागरिकांनी गर्दी केली होती.अखेर काही वेळाने रुग्णवाहिका चालक गणेश माळी याला फेरीवाल्यांनी शिवीगाळ करत मारहाण केली.यात माळी यांच्या हाताला मार लागला आहे.

माळी यांच्या फिर्यादिवरून डोंबिवली रामनगर पोलीस ठाण्यात फेरीवाल्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणी पोलिसांनी दोघा फेरीवाल्यांना ताब्यात घेतले.या प्रकरणी मनसे पदाधिकारी दीपाली पेढणेकर यांनी रुग्णवाहिका चालकास मारहाण करणाऱ्या कडक कारवाई झाली पाहिजे असे सांगितले.




Post a Comment

Previous Post Next Post