डोंबिवली / शंकर जाधव : राज्य उत्पादन शुल्क डोंबिवली विभागाने डोंबिवली पूर्वेकडील बिस्मील्ला चिकन शॉपच्या बाजूला, देशमुख होम्स समोर, महात्मा गांधी रोड, पिसवली, कल्याण शिळ रोड येथे बेकायदेशीर हातभट्टी गावठी दारू वाहतुकीवर प्रोव्हीबीशन गुन्हा अंतर्गत छापा टाकण्यात आला. यामध्ये एक चार चाकी गाडी पकडण्यात आली.या कारवाईत एकूण २४० लीटर हातभट्टी दारू असा एकूण १,६८,६००/- किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.
राज्य उत्पादन शुल्क आयुक्त विजय सुर्यवंशी, संचालक ( अ. व. द. मुंबई) सुनिल चव्हाण, विभागीय उप- आयुक्त प्रसाद सुर्वे, राज्य उत्पादन शुल्क, कोकण विभाग, ठाणे व डॉ. निलेश सांगडे सो. अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, ठाणे यांचे मार्गदर्शनाखाली राज्य उत्पादन शुल्क, डोंबिवली निरीक्षक किरणसिंग पाटील, दुय्यम निरीक्षक एम.एस. होळ, सहाय्यक दुय्यम निरीक्षक एच एच देवकते व वाहन चालक शिवराम जवान यांनी सदरची कारवाई केली.
